शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

श्रमतीर्थावर दृष्टी मिळविण्यासाठी हजारोंची गर्दी

By admin | Updated: December 3, 2014 22:47 IST

मोजक्या कुष्ठरोगी बांधवांना घेवून कर्मयोगी बाबांनी आनंदवनाची निर्मीती केली. आज आनंदवन श्रमतीर्थ म्हणून सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. या श्रमतीर्थावर दृष्टी देण्याचे काम

वरोरा : मोजक्या कुष्ठरोगी बांधवांना घेवून कर्मयोगी बाबांनी आनंदवनाची निर्मीती केली. आज आनंदवन श्रमतीर्थ म्हणून सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. या श्रमतीर्थावर दृष्टी देण्याचे काम मागील १३ वर्षापासून सुरु आहे. दृष्टी मिळावी याकरिता हजारो वृद्ध यावर्षीही श्रमतीर्थावर दाखल झाले आहेत. यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महारोगी सेवा समिती आनंदवन, जेजे रुग्णालय मुंबई, आय केयर संस्था मुंबई व जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून आनंदवन येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीचे शिबिर २७ नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. दरवर्षीची गर्दी बघता दृष्टी मिळविण्याकरिता शिबिराच्या तीन दिवसापूर्वी गरजूंनी गर्दी केली. त्यामुळे आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृह हाऊसफूल झाले. डोळ्यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयाचे नेत्र विभागप्रमुख तथा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. टी. पी. लहाने, नेत्रतज्ञ डॉ. रागीनी पारेख आपल्या सहकाऱ्यासह नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी आनंदवनात दाखल झाले आहेत. आनंदवनातील साईबाबा रुग्णणालयात निवड झालेल्या रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. निवासाची व्यवस्था आनंद विहार, मुकबधीर विद्यालय आदी ठिकाणी करण्यात आली. मागील वर्षी १२ हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १८०० रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आनंदवानातील व्यवस्थेवर आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ व त्यांचे सहकारी आढावा घेत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय आनंदवनच्या शिबिरात झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)