शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बौध्द अनुयायांकडून महामानवाला अभिवादन

By admin | Updated: December 7, 2015 05:11 IST

भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

चंद्रपूर : भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रपुरातील हजारो बौध्द अनुयायांनी गांधी चौक मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील सर्वच बुध्द विहारात व वॉर्डावॉर्डात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील सर्व बौध्द विहारातून व धम्मध्वजापासून बौध्द अनुयायांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत त्या वार्डातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या घोषणा देत सर्व रॅली गांधी चौक ते जयंत टॉकीज मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आली. तिथे रॅली विसर्जित करण्यात आली. तत्पूर्वी समता सैनिक दलाच्या जवानांनी अतिशय शिस्तीत रॅली काढून बाबासाहेबांना सलामी देत श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीनेही बाईक रॅली काढण्यात आली. अनेक रॅलीचे नेतृत्व भिक्खू संघाने केले होते. रॅलीदरम्यान ‘महापरिनिर्वाण दिन चिरोयू होवो’, ‘जबतक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. सर्व रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरही उपस्थित पाहुण्यांनी प्रकाश टाकला. (शहर प्रतिनिधी)सायंकाळी निघाली भीमज्योत रॅलीरविवारी सकाळपासून बौध्द अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ लागले. सायंकाळपर्यंत बौध्द अनुयायांचे येणे सुरूच होते. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून भव्य भिमज्योत रॅली काढण्यात आली. कॅण्डल घेऊन हजारो बौध्द अनुयायी यात सहभागी झाले. ही भिमज्योत रॅली दीक्षाभूमीवर गेली. तिथेही महामानवाला अभिवादन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनीही केले अभिवादनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका खासगी कामासाठी आज रविवारी चंद्रपुरात आले होते. त्यांनीही महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील गांधी चौकाजवळ स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे उपस्थित होते. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच लोकशाही समृध्द बनली-अहीरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेमुळेच देशाचे सार्वभौमत्व व या देशाची लोकशाही समृध्द बनली, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हंसराज अहीर यांनीही बाबासाहेबांच्या अस्थीकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.