शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तलावाच्या मागणीसाठी भटारीवासीयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:46 IST

पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली.

तलाव फक्त कागदावर : ३६ वर्षांपूर्वी प्रशासकीय मंजुरी चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र, या तलावाचे बांधकाम ३६ वर्षांनंतरही सुरू न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सूरज गोरंतवार यांच्या नेतृत्त्वात भटारीवासीयानी पोंभुर्णा तहसील कार्यालयासमोर शनिवारी ठिय्या आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने आलेल्या भटारीवासीयांनी पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या कामचुकार धोरणाच्या आंदोलन केले.वनग्राम भटारी येथील शेतकऱ्यांच्या शेतीकरिता पाण्याची समस्या जाणून जिल्हा परिषदेने १२ नोव्हेंंबर १९८० रोजी ठराव क्र. ९ नुसार प्रशासकीय मंजुरी दिली. त्या अनुषंगाने त्यांचे सीमांकन झाले. मात्र तलावाचे काम अजूनही सुरू झाले नाही. भटारी येथील राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. १०७ मधील तलाव बांधकामाकरिता ३८.२० हेक्टर जमीन भूसंपादन करायची होती. त्याकरिता गैर वनक्षेत्राची महसूल विभागाच्या अधीनस्त ७६.४० जमीन वन विभागाला द्यायवयाची होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ७६.४० हेक्टर जमिनीपैकी ७१.४१ हेक्टर जमीन योग्य असल्याचे व ४.९९ हेक्टर जमीन अयोग्य असून अतिक्रमण असल्याचे कळविण्यात आले. २००५ मध्ये राजुरा परिक्षेत्रातील महसूल विभागाच्या ताब्यातील ‘परमपोक’ क्षेत्र ही अतिक्रमण असल्याचे कळविले. शिवाय लघु सिंचन विभागाने भटारी येथील प्रास्तावित तलावाचे सुधारित अंदाजपत्रक १ कोटी ५२ लाख ४८ हजार ७४६ रुपये असल्याने व सिंचन तलावाकरिता शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन गोंडपिंपरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तलावाचा वन प्रस्ताव रद्द करण्याबाबत कळवून मोकळे झाले. महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या सर्वांगिण विकासाकरिता कायद्याची अंमलबजावणी केली खरी असली तरी १०० टक्के आदिवासी गाव असलेल्या भटारी गावाला दुजाभाव सहन करावा लागत आहे.या आंदोलनात सुरज गोरंतवार, रमेश वेलादी, मारोती पेंदोर, देविदास पेंदोर, बापूजी शेडमाके, वासुदेव पेंदोरे, पितांबर पेंदोर, प्रभाकर कुसराम, श्रावण पेंदोर, श्रीहरी पेंदोर, मारोती कोवे, सोमाजी शेडमाके, तुळशीराम पेंदोर, रघुनाथ कोडापे, उषा आलाम, सुवर्णा पेंदोर, मंगला कन्नाके, कवडू कुंदावार, गिरीधरसिंह बैस, रुषी हेपट यांचेसह शेकडो भटारीवासी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)रोजगारासाठी आंध्र प्रदेशची वाटभटारीतील लोकसंख्या ८५० च्या वर आहे. या गावात शेतीची पुरेसी सोय नाही. तसेच रोजगार नसल्याने २०० पेक्षा अधिक तरुण, वृद्ध, महिला पोट भरणाच्या निमित्ताने आंध ्रप्रदेशात जात आहेत. भटारी ग्राम विकास कृती समितीच्या वतीने शेकडो महिला, पुरुषांनी, आबाल- वृद्धांनी पोंभुर्णा तहसील कार्यालय परिसरात ठिय्या देवून मागणीच्या संबंधाने तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन सादर केले.