शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांपैकी ९, ८८९ बाधित पुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 05:00 IST

मंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती येथील ७१ वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २२६, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६२७३ महिला पॉझिटिव्ह : १७८७ ज्येष्ठांनाही बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आता एकूण बाधितांची संख्या १६ हजार १७२ झाली आहे. विशेष म्हणजे यात पुरुष बाधितांचीच संख्या अधिक आहे. आतापर्यंत नऊ हजार ८८९ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे तर महिलावर्ग घरीच अधिक राहत असल्याने बाधित होण्यामध्ये त्यांची संख्या कमी म्हणजे सहा हजार २७३ आहे. याशिवाय ६० वर्षांवरील तब्बल एक हजार ७८७ वृध्दांनाही कोरोनाने ग्रासले आहे.मंगळवारी १८२ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १६ हजार १७२ वर पोहोचली आहे. तसेच १३४ बाधित कोरोनातून बरे झाले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. बाधितही दररोज आढळून येत आहेत. याउलट दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. अशावेळी नागरिकांनी गाफील राहण्यापेक्षा बाजारपेठेत जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत १३ हजार १३५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.सध्या दोन हजार ७९५ बाधितांवर उपचार सुरू आहे.सहा जणांचा मृत्यूमंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती येथील ७१ वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २२६, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील लक्ष्मी नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, विवेकानंद वार्ड, सुभाष वार्ड, गांधी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गणपती वार्ड, बामणी, संतोषीमाता वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, डोंगरगाव रेल्वे, जाजू हॉस्पिटल परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, शेष नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे.चंद्रपुरात येथे सापडलेले नवे बाधितचंद्रपूर शहरातील व परिसरातील गजानन मंदिर वार्ड, चव्हाण कॉलनी परिसर, सरकार नगर, तुकडोजी नगर, कृष्णा नगर, नगिना बाग, साईबाबा वार्ड, बापट नगर, गांधी नगर, बाबुपेठ, दुर्गापूर, ताडाळी, भिवापूर, जयराज नगर, हॉस्पिटल वार्ड, शिवाजीनगर, तुकूम, सुमित्रा नगर, ओम नगर, जटपुरा गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, उत्तम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.तालुक्यात सापडलेले नवे बाधितजिल्ह्यात मंगळवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये ११८ पुरूष व ६४ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ५५, बल्लारपूर तालुक्यातील २०, चिमूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १०, ब्रह्मपुरी तालुक्यातील १०, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील ३५, सिंदेवाही तालुक्यातील आठ, राजुरा तालुक्यातील १०, गडचिरोली ११ तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या