शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेला यंदाचा कापूस बोंडअळी हिसकावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:12 IST

सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली. मात्र, गुलाबी बोंडअळीचा कहर सुरू झाल्याने नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार २०० फेरोमेन ट्रॅप व १६ हजार २२ ल्युर्सचे शेतकऱ्यांना वाटप केले.

ठळक मुद्देखबरदारीसाठी एक लाख २८ हजार शेतकऱ्यांना पाठविले एसएमएस

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात यंदा १ लाख ७४  हजार ९६२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली. कापूस पीक सध्या बोंड अवस्थेत आहे. काही ठिकाणी वेचणी सुरू झाली. मात्र, गुलाबी बोंडअळीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला कापूस उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली. कृषी विभाग अलर्ट झाला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एम-किसान पोर्टलवरून १ लाख २८ हजार  २६५  शेतकऱ्यांना कापूस पिकाचे १५ एसएमएस पाठविण्यात आले आहेत.सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली. मात्र, गुलाबी बोंडअळीचा कहर सुरू झाल्याने नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार २०० फेरोमेन ट्रॅप व १६ हजार २२ ल्युर्सचे शेतकऱ्यांना वाटप केले. याशिवाय क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पीक लागवड करीत असलेल्या तालुक्यांत २८० निश्चित प्लॉटसाठी ११२० फेरोमेन ट्रॅप व ३३ हजार ६० ल्युर्स वाटप, गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे १६० फ्लॅशकार्ड तयार केले. क्रॉपसॅप योजनेंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी १५०.५ लीटर इमामेक्टीन बेन्झोएट रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे.

उत्पादन घटणार ?

यंदा कपाशीची स्थिती चांगली होती. पूरक पाऊस पडल्याने पिकाची उत्तम वाढ झाली. मात्र काही दिवसापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा उत्पन्न घटू शकते. 

क्रॉपसॅप अंतर्गत जिल्ह्यात २२१ कृषी सहायकांद्वारे १४ हजार ५०४ व ५० कृषी पर्यवेक्षकांनी ३ हजार २०० पीकनिहाय सर्वेक्षण केले. त्यांच्यामार्फत २ हजार ५५६ गाव बैठका घेतल्या. गुलाबी बोंडअळी निर्मूलनासाठी १३७ गावांत दवंडी दिली. गुलाबी बोंडअळी ही बोंडात असल्याने प्रादुर्भाव लक्षात येत नाही. त्यामुळे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -भाऊसाहेब बहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती