शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील पाण्यावर भागते तहान!

By admin | Updated: January 17, 2015 02:00 IST

एकीकडे बाटलीबंद पाण्याची संस्कृती पुढे येत असताना दुसरीकडे पहाडावरील मच्छीगुडा, घोडणकप्पी कोलामगुडा, पाटागुडा (पाटण), खडकी, चलपतगुड्यातील कोलामांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवती एकीकडे बाटलीबंद पाण्याची संस्कृती पुढे येत असताना दुसरीकडे पहाडावरील मच्छीगुडा, घोडणकप्पी कोलामगुडा, पाटागुडा (पाटण), खडकी, चलपतगुड्यातील कोलामांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.आंध्र-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील गावे पहाडी व दुर्गम भागात वसल्याने मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रत्यक्षात जिवती तालुक्यातील गाव-गुड्याची स्थिती भयावह आहे. जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावात विकासाची गंगा पोहोचली नाही. इतर गावांच्या तुलनेत खडकीतील कोलामाची स्थिती अत्यंत दयनिय आहे. गावात जाण्यास रस्ता नाही, आरोग्य, पाण्याची सोय नाही. ही त्यांची स्थिती प्रत्यक्ष गाव बघितल्यावरच कळेल. मच्छीगुडा, घोडणकप्पी, चलपतगुड्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही योजना राबविली नाही. काही गावातयोजना राबविली आहे. मात्र तीही पूर्ण झालेली नाही.आजही कोलामांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. झऱ्यातील गाळ काढणे आणि त्याच पाण्यावर तहान भागवणे हा नित्यक्रम त्यांचा आहे. पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे साथीच्या आजारामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. जवळपास आरोग्य सुविधा नसल्याने प्राथमिक उपचार होत नाही. त्यामुळे अनेकांचा जिव सुद्धा गमवावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न आणि मुलभूत सोयीसुविधांच्या अभावाला कंटाळून काही नागरिकांनी खडकी, चलपतगुडा सोडला आहे. अनेक कोलामांनी सोयीच्या ठिकाणी स्थायी झाले आहे. अशीच स्थिती राहिल्यास गावचे गाव स्थलांतरीत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुलभुत सुविधा नसल्याने येथील विकास खुंटला आहे. ग्रामस्थांमध्ये धडपड करण्याची क्षमता आहे पण सुविधांअभावी त्यांचे जगणे कठिण होत आहे.