शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुषित पाण्याने भागते तहान

By admin | Updated: January 12, 2015 22:46 IST

दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा

२२० पाणी नमूने दुषित : पाणीपुरवठा योजनांवर प्रश्नचिन्हचंद्रपूर : दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वीत झालेल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी तपासणीत जिल्ह्यातील २२० पाणी नमुने दुषित आढळले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर प्रश्ननिर्माण झाले असून दुषित पाण्यावरच नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची असते. अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक हातपंप व विहीरींच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागत आहे. या पाणी स्त्रोतांची देखभाल व दुरुस्ती संबधीत ग्रामपंचायत, नगर पालिका व मनपा प्रशासनाची आहे. पाणी वाटपात उद्भवत असलेल्या समस्या दूर करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे. मात्र, पाणीपुरवठ्यात येत असलेल्या विविध अडचणींमुळे अनेक गावात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हगवण, गॅस्ट्रो, साथीचे आजार पसरले आहेत. चार दिवसांपूर्वीच मूल तालुक्यातील ताडाळा येथील १५ जणांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने उपचारासाठी मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नळाची पाईपलाईन लिकेज होऊन दुषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचे ग्रामसेवकाने म्हटले होते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग पाणीपुरवठा योजनांवर संनियंत्रणाचे काम करते. दर महिन्याला पाणी नमूने घेऊन दुषित पाणी आढळल्यास त्यांना उपाययोजना करण्याचे सूचित केले जाते. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा व शुद्धीकरणासंबधी उपाययोजना करतात. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये १५ तालुक्यात २ हजार २८१ पाणी नमुन्याची तपासणी केली. यात १४० नमुने दुषित आढळले. नोव्हेंबर महिन्यात २ हजार ४६२ नमुन्यांची तपासणी केली असता, २१८ नमुने दुषित आढळले. तर डिसेंबर महिन्यात घेतलेल्या ३ हजार ९७ नमुन्यांपैकी २२० नमुने दुषित आढळले आहेत. या दुषित पाण्याची टक्केवारी ७.१० एवढी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)