शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याने भागते चंद्रपूर जिल्ह्याची तहान

By admin | Updated: June 1, 2016 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते.

बेंबळा धरणाचे पाणी सोडले : उद्योगांनाही लाभप्रवीण खिरटकर वरोराचंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते. मात्र उन्हाळा सुरु होताच वर्धा नदीची धार आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर विसंबुन असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण झाली. उन्हाळ्यात पाणी देणारे वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने तिथून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळले नाही. अखेरीस यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळ धरणातून वर्धा नदीला ३० दलघमी पाणी सोडण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ नळ योजना भर उन्हाळ्यात कार्यान्वीत झाल्या आहेत. या पाण्याचा उद्योगांनाही लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा नदी एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर वाहत आहे. वर्धा नदीच्या काठावर अनेक गावे वसली असल्याने त्या गावातील नागरिक वर्धा नदीच्या पाण्यावर विसंबून राहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शहरांना वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ नळ योजना व ५६ संस्था नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्याची चाहुल लागताच वर्धा नदीची धार आटली. सूर्य आग ओकत असताना वर्धा नदीची धार पूर्णत: आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्धा नदीत पाणी सोडण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील धरणाचा आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यातील धरणात कमी पाणी साठा असल्याने तेथील प्रशासनाने लाल व पोथरा धरणातून कॅनलद्वारे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात सोडून ते वर्धा नदीच्या पात्रात सोडण्याची योजना आखली. कॅनलमधून पाणी येत असताना उष्ण तापमानाने पाणी पाहिजे त्या प्रमाणात वाहत नव्हते. त्यामुळे सदर योजनेतून वर्धा नदीच्या पात्रातून पाणी येणे शक्य नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणाची पाहणी करून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला बेंबळ धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तातडीने वर्धा नदीत ३० दलघमी पाणी नुकतेच सोडले आहे. सध्या वर्धा नदीच्या दोन्ही पात्रातून पाणी वाहत असल्याने याचा फायदा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे. उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवून शेजारी धर्म पाळला असल्याने दिसून येत आहे. पाठपुराव्याचा ध्यास व परिणाम वर्धा नदीत प्रारंभी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवावी, अशी आग्रही भूमीका उन्हाळ्याच्या प्रारंभी आ. बाळू धानोरकर यांनी घेतली होती. वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणातून वर्धा नदीत पाणी सोडावे, याकरिता आ. धोनोरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने वर्धा नदीमध्ये धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.