शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

धार्मिक स्थळांवर राहणार तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’

By admin | Updated: March 28, 2015 01:01 IST

गुन्हेगारीवर आळा घालने सोईस्कर व्हावे याकरिता शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

वरोरा : गुन्हेगारीवर आळा घालने सोईस्कर व्हावे याकरिता शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यातच धार्मिक स्थळांनाही अलीकडेच चोरट्यांनी लक्ष केले आहे. त्यामुळे आता धार्मिक स्थळामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता धार्मिक स्थळांच्या पंच कमेटीला जिल्हा प्रशासनाने पत्र दिले आहे. त्यामुळे आता प्रत्येक धार्मिक स्थळावर तिसऱ्या डोळ्याच्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या चौकात, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता प्रशासन सरसावले आहे. बँकेमध्ये यापूर्वीच कॅमेरे लागले असल्याने बँक ग्राहकांची बँकेतील लुबाडणुक काही अंशी कमी झाल्याचे दिसते. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे, अशा ठिकाणी चोरटे चोरीस धजावत नसल्याचा प्रशासनाचा अनुभव आला आहे. मात्र मागील काही वर्षात धार्मिक स्थळामध्ये उत्सवादरम्यान महिलांचे दागीने तर पुरुषांचे पॉकीट पळविणे अशा घटना चोरट्यांकडून घडल्या. रात्री व दुपारी सामसुम असताना धार्मिक स्थळावर चोरट्याची नजर आहे. रात्रीच्या वेळी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी जावून आपला हात साफ करीत असल्याने त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने धार्मिक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता संबंधित कमेटीला आव्हान करत पत्र दिले आहे. धार्मिक स्थळाच्या समित्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.(तालुका प्रतिनिधी)