शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही कोळशाचे उत्पादन ठप्पच

By admin | Updated: March 4, 2017 00:36 IST

वेकोलि माजरी प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन गेल्या दोन वर्षापासून उत्पादन घेणे सुरू केले आहे.

महाप्रबंधकांनी आंदोलनस्थळी घेतली बैठक : मरू पण जागेवरून हटणार नाही!माजरी : वेकोलि माजरी प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन गेल्या दोन वर्षापासून उत्पादन घेणे सुरू केले आहे. यात जवळजवळ १२० प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी खदाण बंद करीत आंदोलन पुकारले. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. लागोपाठ तीन दिवस उत्पादन ठप्प असल्याने वेकोलिला १५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी वेकोलिचे महाप्रबंधक सत्येंद्र पाण्डेय यांनी आंदोलनस्थळी बैठक घेतली. यावेळी नियोजन अधिकारी मुजाहीदीन, शर्मा कार्मिक प्रबंधक त्रिपाटी, प्रहारचे नेता अमोल डूकरे, प्रकल्पग्रस्त निलेश ढवस, संदीप झाडे, गोकुल डोंगे, रामू डांगे, वेकोलि कामगार संघटनेचे एम. एम. माकोडे, सी.एच. राहागंडाले, दीपक डोंगरवार, आर.के. राय, धरमपाल, संजय दुबे व सर्वच प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधक सत्येंद्र पांण्डेय यांनी १४ मार्च २०१७ पर्यंत दहा जणांना नोकरीचे आदेश देतो व उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तीन महिन्यात नोकरीचे आदेश देवू असा प्रस्ताव ठेवला. यावर प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनस्थळावर सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश दिल्याशिवाय ही नागलोन ओपनकास्ट खदान २ सुरु होवू देणार नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी नरेंद्र जीवतोडे, अंकुश आगलावे, जि.प. सदस्य प्रविण सूर हेसुद्धा बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.आंदोलनस्थळावरच मरण येईल तरी बेहत्तर; पण आम्ही येथून हटणार नाही, असे प्रकल्पग्रस्तांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)तीन ठिकाणी वेगवेगळ्या बैठका सुरुकाल प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन निवेदन दिले असता बच्चू कडू यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांनी भद्रावती विश्रामगृहात बैठक लावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाही तोडगा निघाला नाही. तसेच दुसरी बैठक वेकोलि माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयात झाली. कुचना येथे प्रकल्पग्रस्तांना चर्चा करण्याकरिता बैठक बोलावली होती. पण प्रकल्पग्रस्त नोकरीचे आदेश मिळाल्याशिवाय काही ऐकायला तयार नाही. तसेच भाजपाचे अंकुश आगलावे, नरेंद्र जिवतोडे, जि.प. सदस्य प्रविण सूर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्याशी संपर्क करुन प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. यावर केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी दूरध्वनी व जिल्हाधिकारी व वेकोलि नागपूरच्या निदेशकांशी चर्चा करुन तात्काळ नोकरीचे आदेश देण्यास कळविले. या आंदोलनामुळे वेकोलि अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून आता या प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकीरचे आदेश दिल्याशिवाय पर्याय दिसत नाही. हे काम बंद आंदोलन परिसरात चांगलेच तापत असून प्रकल्पग्रस्त काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.वकोलिच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केली आहे, हे विशेष.