शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

By admin | Updated: August 24, 2014 23:23 IST

येथील ग्रामपपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता गांधी चौक येथे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी

घुग्घुस : येथील ग्रामपपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता गांधी चौक येथे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्या प्रभाकर चिकनकर यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी स्थानिक प्राथमिक केंद्रात दाखल केले.उपोषणादरम्यान तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या रामेश्वर हिक्ररे, अनिल बांदूरकर यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच आहे. घुग्घुस गावाची लोकसंख्या व भौगोलिक, औद्योगिक क्षेत्र लक्षात घेऊन घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याची मागणी गेल्या बारा-पंधरा वर्षापासून सातत्याने होत आहे आणि या क्षेत्राचे आजी माजी आमदार- खासदार राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडून वेळोवेळी आश्वासन मिळत असले तरी घुग्घुस गावाला नगर पालिका देण्यात आली नाही. शासनाचे सर्व निकष बाजूला सारुन घुग्घुस नगर पालिकेला वगळून शासनाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगर पंचायत तर एका नगर पालिकाची घोषणा केली. हा अन्यायकारक प्रकार असल्याने घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीद्वारे रस्ता रोको, घुग्घुस बंदचे यशस्वी आंदोलनानंतर घुग्घुस गांधी चौकात २२ आॅगस्टपासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. उपोषणाला माजी ग्रा.पं. सदस्य रामेश्वर हिकरे, प्रभाकर चिकनकर तथा अनिल बांदुरकर बसले आहे. आंदोलनाला आरपीआय, बसपा, शिवसेना व मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.दरम्यान २३ आॅगस्टला अचानक समितीचे सचिव इबादुल हसन सिद्दीकी यांनी दुपारी एका मोबाईल टावरवर चढून याच मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने सहा तास विरुगिरी केली. आज उपोषणकर्ता प्रभाकर चिकनकर यांची प्रकृती खालावली असता पोलिसांनी त्याला दवाखान्यात हलविले. विशेष म्हणजे, हे आंदोलन नागरिकाचे असून कोत्याही राजकीय पक्षाचे नाही. (वार्ताहर)