शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही अटक

By admin | Updated: March 26, 2017 00:29 IST

चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उरकूडपार गावाशेजारी एका प्रेमप्रकरणातून मनोज जुमनाके यांचा कट रचून २५ डिसेंबर २०१६ रोजी खून करण्यात आला.

चिमूर पोलिसांच्या सायबर शाखेची कारवाईचिमूर : चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उरकूडपार गावाशेजारी एका प्रेमप्रकरणातून मनोज जुमनाके यांचा कट रचून २५ डिसेंबर २०१६ रोजी खून करण्यात आला. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात चिमूर पोलिसांना यश आले होते. मात्र या खुनातील तिसरा आरोपी शाबीर मोहम्मद रसुल शेख (३३) फरार होता. चिमूर पोलिसांची टीम या तिसऱ्या आरोपीचा कसून शोध घेत होती. अखेर सायबर शाखा चंद्रपूरच्या मार्फतीने ‘कॅफ’ने या खुनातील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून २० मार्च २०१७ ला नाहरगड (राजस्थान) येथून अटक केली आहे.चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उरकुडपार येथील रहिवासी प्रज्ञा संघप्रिय गेडाम व मनोज जुमनाके रा. पिंपळनेरी (पेठ) यांचे प्रेम संबंध होते. यातूनच दोघात वाद झाला. या वादाचे पर्यावसान मनोज जुमनाके यांच्या खुनात झाले. मृत मनोज जुमनाके यांच्या खुनाच्या कटात आरोपी प्रेयसी प्रज्ञा गेडाम, भाऊ सिद्धार्थ बालाजी लोखंडे व तिसरा आरोपी शाबीर शेख यांचा समावेश होता.मनोज जुमनाके यांना रात्री उरकुडपार येथे बोलावून २५ डिसेंबर २०१७ ला तीनही आरोपींनी मिळून कट रचून मनोजचा खून केला. या कटातील तिसरा आरोपी शाबीर मोहम्मद शेख ३३) रा. नाहरगड ता. कीशनगंज जि. बारा (राजस्थान) याचा काहीच पत्ता नसल्याने या आरोपीचा शोध घेताना चिमूर पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र त्याच्याकडे असलेल्या मोबाईल सीमसाठी जोडण्यात आलेल्या पुराव्यानुसार (कस्टमर अप्लीकेशन फार्म) ‘कॅफ’ वरील माहितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या मदतीने ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोज ताले, देविदास रणदिवे, कुणाल राठोेड या पथकाने राजस्थान गाठून आरोपी शाबीर शेख याला राजस्थान येथून २० मार्चला अटक केली व कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईने चिमूर पोलिसांचे नागरिकांकडून व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)