शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:38 IST

आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देवसतिगृह प्रवेशापासून डावलले : आंदोलनात पालकही सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.आदिवासी प्रकल्प कार्यालयातअंतर्गत जिल्ह्यात २९ वसतिगृह चालविले जातात. मागील दोन वर्षांपासून प्रवेशाकरिता आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. दोन्ही तालुक्यातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थी आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी अर्ज केले. मात्र त्यांना डावलण्यात आले, असा आरोप श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. काही वसतिगृह सुरुच करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान कोरपणा, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने पालकांसह विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने पालकांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवल्याने १३ जुलैला आंदोलन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र रविवारी त्यांना वसतिगृहाबाहेर ठेवण्यात आले, असा आरोप अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे विद्यार्थी कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते.आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे विद्यार्थी या प्रक्रियेला सामोर जातात त्यांना मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. कोरपना-जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची प्रशासनाला जाणीव आहे. मंगळवारी वसतिगृहाची अंतिम यादी प्रकाशित होईल. त्यानंतरच प्रवेशाची समस्या सुटू शकेल.- केशव बावणकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी