शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:31 IST

गुजरात राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीमार्गे बिलासपूर येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक मूल कृषी विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला. यामध्ये २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधून बिलासपूरला बियाण्यांची तस्करीट्रक चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गुजरात राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीमार्गे बिलासपूर येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक मूल कृषी विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला. यामध्ये २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे.देशात लॉकडाऊन आहे, असे असतानाही अत्यावश्यक सेवा सुरु आहे. हीच संधी साधत गुजरात राज्यातील सानंद येथून क्र. एमएच ३२ सीक्यु ९८८२ मधून विक्रीस बंदी असलेले चोर बिटी बियाणांची तस्करी होत असल्याची माहिती मूल येथील कृषी विभागाला मिळाली. तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, सहायक पोलीस निरीक्षक ठवरे यांच्यासह मंडळ अधिकारी दिपतांशु तिजरे, कृषी पर्यवेक्षक तथा मंडळ अधिकारी रविशंकर उईके यांनी बेंबाळ येथे गस्त सुरु केली. दरम्यान, सदर ट्रक मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आल्यानंतर अडवून तपासणी करण्यात आली. यामध्ये राघवा तसेच मेघना कंपनीच्या प्रत्येकी १ हजार बॅग आणि अरूणोदया कंपनीच्या सुमारे दीड हजार चोर बिटीच्या बॅग आढळून आल्या. या बॅग जप्त करण्यात आल्या. चोरबिटीची किंमत २५ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. आयसर कंपनीचा ट्रक ४ लाख रुपए असा एकूण २९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी मूल तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ट्रक चालक अब्दुल रिशीक रफीक शेख रा. नागपूर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४२० भादंवी, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, कापूस बी बियाणे अधिनियम २००९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagricultureशेती