शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चोर बिटी कापसाने संकटे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:01 IST

मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठळक मुद्देउन्हाळी बाजारपेठ मंदावली : जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादकही चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी चोर बिटी बियाणे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होवून कापसाची प्रतवारी खराब झाल्याने कापसाचे दर घसरले. त्यामुळे जिनिंग व्यवसायी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर उन्हाळ्याच्या उलाढालीमध्ये झाला असल्याने बाजारपेठही आर्थिक अडचणीत आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरी, जामणी, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात रोखीने समजले जाणारे कापसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असते. पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून वरोरा तालुक्याला जनवैभव प्राप्त झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासोबतच यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील कापूस विक्रीकरिता मोठ्या प्रमाणात आणला जातो. मागील हंगामात बिटी वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली. बिटी कापूस बियाणांची लागवड केल्यास त्यावर रोग येत नसल्याचा समज शेतकऱ्यासह सर्वांचा झाला होता. मागील हंगामात पावसाने उसंत दिल्याने चोर बिटी बियाण्यामुळे यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आदी जिल्ह्यात कपाशीच्या पिकांची मशागत चांगली होवून पिक मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र त्यानंतर कापसाचे उत्पादन हाती येण्यापूर्वीच कापसाच्या बोंडाला गुलाबी अळीने ग्रासले. शेतात एकही कपाशीचे झाड गुलाबी बोंडअळीने सोडले नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी उभ्या कपाशीच्या पिकात नांगर फिरवून टाकल्याचा घटना घडल्या होत्या. गुलाबी बोंडअळीमधून कापूस निघाला. मात्र प्रतवारी घसरल्याने दरही घटले. त्यासोबत कापूस वेचणी करणारे व जिनींगमधील कामगारांना त्वचा रोग होणे सुरू झाल्याने शेतात व जिनींगमध्ये मजूरही सापडेना. मजूर सापडल्यास वेचणीचा दर प्रतिकिलो २० रूपयांपर्यंत गेला आणि दर दोन हजार रूपये क्विंटल मिळाला. जिनींगमधील कापूस काळा पडत असल्याने राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या गाठीच्या मागणीला मंदी आल्याने जिनींग व्यवसायी यावर्षीच्या हंगामात आर्थिक टंचाईमध्ये सापडला आहे. याचा परिणाम विवाह सोहळे व इतर बाजारपेठेवर झाला आहे.सरकी तेल उत्पादनात घटएक क्विंटल सरकीमधून १६ किलो तेल निघत होते. गुलाबी बोंडअळीने सरकीलाही खाल्ल्याने सध्या एका क्विंटल सरकीमधून दहा ते अकरा किलो तेल निघत आहे. त्यातून जनावरांच्या ढेपेलाही मागणी अत्यल्प आहे. याचा भुर्दंड जिनिंग व्यवसायिकांना बसत आहे.

टॅग्स :cottonकापूस