शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
7
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
8
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
9
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
10
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
11
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
12
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
13
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
14
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
15
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
16
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
17
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
18
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
19
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
20
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!

पोटासाठी त्यांनी थाटला शेतातच संसार

By admin | Updated: March 28, 2016 01:06 IST

टिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची

प्रकाश काळे ल्ल गोवरीटिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची सोय नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटविण्यासाठी रोजगाराच्या शोधात असलेल्या त्या दोन कुटुंबीयांनी चक्क तेलंगणा राज्यातून राजुरा तालुक्यातील गोवरी येथे स्थलांतर केले आहे. येथील एका शेतातच संसार थाटला आहे. त्यांच्या रोजगाराच्या प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी त्यांना पुन्हा कायमस्वरूपी रोजगार मिळविण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.तेलंगणा राज्यातील रूपारूर जि. आदिलाबाद येथील मनोहर विठ्ठल जाधव (४५) व भानुदास माणिक जिव्हारे (६०) यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने पोटाची भूक त्यांनी जवळून अनुभवली आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडा नाही, राहायला धड घर नाही. गावाकडे रोजगाराची संधी नाही. एक दिवस मजुरी मिळाली तर चार दिवस हाताला काम नाही, अशा परिस्थितीत पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. घरी मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च समोर होताच. मात्र या दोन कुटुंबीयांनी हार मानली नाही. रोजगाराच्या शोधात त्यांनी गाव सोडले. भटकंती करीत त्यांनी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांच्या गावाजवळील शेतातच संसार थाटला. रणदिवे यांचा थोरला मुलगा अमित रणदिवे, सुमीत रणदिवे यांनी त्यांना राहण्याची सोय करून दिली.गेल्या तीन-चार महिन्यापासून रोजगाराच्या शोधात आलेले हे कुटूंब शेतातच वास्तव्याला आहेत. मनोेहर जाधव यांना दोन मुले व एक मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगी फुलाबाईने दहाव्या वर्गातूनच शिक्षण सोडले. तर त्यांची दोन मुले वसतिगृहात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांना रोजगारासाठी मदत व्हावी, यासाठी मुलगी फुलाबाई त्यांच्या कामात मदत करते. तर भानुदास जिव्हारे यांच्या पत्नी सावित्रीबाई त्यांना रोजगारासाठी हातभार लावत आहे. दिवसभर शेतात राबायचे आणि काळ्या आईच्या कुशीत क्षणभर विश्रांती घ्यायची, हेच त्यांना ठाऊक आहे.होळी सणाला गावाला का गेले नाही, अशी विचारणा केली असता ‘सण बिन काई नाई’ दोन वेळेच्या जेवणाचे वांदे आहेत. तिथे कुठला आला सण, असे त्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. हाताला काम मिळेल, तिथपर्यंत थांबायचे आणि पुन्हा दुसऱ्या गावी नवा रोजगार शोधायचा, हेच कायम त्यांची नशिबी आले आहे. ऊन्ह-वाऱ्याची तमा न बाळगता त्या दोन कुटुंबीयांनी चार महिन्यापासून शेतातच संसार थाटला आहे.हाताला काम मिळणे झाले कठीण४विज्ञानाने विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याने मजुरांच्या हाताने केले जाणारे काम आधुनिक मशीनने केले जात आहे. दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. त्यामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. रोजगार मिळत नसल्याने मजुरांना परप्रांतात जाऊन काम करावे लागत आहे.