शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी झाडे लावली आणि जगवली सुद्धा

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

झाडे लावणे, ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांनी कोणताही गाजावाजा न करता झाडे लावली आणि ती जगवलीसुद्धा आहेत.

नागभीड : झाडे लावणे, ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांनी कोणताही गाजावाजा न करता झाडे लावली आणि ती जगवलीसुद्धा आहेत. नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कानपा येथील वासुदेवराव पाथोडे या आदिवासी कनिष्ठ कला महाविद्यालयातील शिक्षकांने ही करामत केली आहे. या शाळेने मागील वर्षी शाळेच्या परिसरात विविध जातीची अंदाजे १५० झाले लावली. ही झाडे लावण्यासाठी त्यांना कोणी आग्रह केला नाही. स्वयंस्फूर्तीने ते पुढे आले आणि वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करुनच ते मोकळे झाले नाही तर, लावलेली झाडे जगविण्याचा त्यांनी निर्धार केला.ही वृक्ष लागवड पावसाळ्यात करण्यात आल्याने पावसाळ्यात त्यांना या झाडांना पाणी घालण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मात्र शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर उन्हाळ्यात या झाडांना जगवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला. यावर त्यांनी विचार विनिमय करुन या झाडांना पाणी घालण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली. प्रत्येकाला दिवस वाटून दिले. ठरल्याप्रमाणे हे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी झाडांना पाणी घालू लागले. झाडांची एकंदर स्थिती लक्षात घेवून संस्थेचे अध्यक्ष गजानन पाथोडे यांनी या झाडांसाठी कठड्यांची व्यवस्था पण करून दिली. आज ही झाडे डोलदार झाली आहेत. लावण्यात आलेल्या १५० झाडांपैकी ११० ते ११५ झाडे डौलाने मिरवित आहेत. मुख्यध्यापक राजू निकुरे आणि प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक कदीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची संपूर्ण चमू या झाडांची निगा राखत आहेत. (तालुका प्रतिनिधी)