ब्रह्मपुरीत जनसागर : ३० वर्षांनंतर आल्या इंदिराजींच्या स्नुषारवी रणदिवे - ब्रह्मपुरीतब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या उत्सुकतेने हजारोंचा जनसमुदाय त्यांना बघून आणि प्रत्यक्ष ऐकून भारावलाच. पण जनतेजवळ जाऊन त्यांनी स्वीकारलेल्या सर्वसामान्यांच्या अभिवादनाने त्यांनी या सभेलाच जिंकून घेतले.नियोजित वेळी त्यांचे आगमन झाले असले तरी दुपारी १ वाजतापासूनच गर्दी व्हायला लागली होती. दुपारपासूनच जनतेचे लोंढे दाखल व्हायला लागल्याने रस्ते फुलून गेले होते. दुपारी ३.५० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर अवकाशात दिसताच टाळ्यांनी आणि ‘सोनिया गांधी आगे बढो’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला. आपल्या ११ मिनिटांच्या भाषणात गरिबी, बेरोजगारी, स्थैर्य आणि विकासावर भर देत त्यांनी येथील जनतेला वचनपूर्तीचा शब्द दिला. सभेनंतर त्यांनी जनतेजवळ जावून संवादही साधला. अनेकांनी त्यांना आॅटोग्राफची विनंती केली. मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. विजय वडेट्टीवारांनी दिला जिल्हा निर्मितीचा शब्दआमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा शब्द दिला. ते म्हणाले, काँग्रेसने नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला आहे. ब्रह्मपुरीच्या जिल्हा निर्मितीच्या मागणीची भावना विकासातूनच आली असल्याने आपण निवडून आल्यास वर्षभरात हा शब्द पूर्ण करून दाखवू. सिंचनावर बोलताना ते म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी टेलपर्यंत पोहोचविणे हा आपला शब्द आहे. गोसेखुर्दच्या सिंचनात प्रचंड घोटाळे झाले. या घोटाळेबाजांना हटविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा. ब्रह्मपुरी जुना तालुका असूनही एमआयडीसी नाही. शिक्षणात तांत्रिकतेची येथे उणीव आहे. शासकीय रुग्णालय ३० बेडवरून १०० वर पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे. येथे उद्यान, सिंचन, हायटेक सिटी उभारण्याचाही शब्द त्यांनी दिला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजुकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्या आल्या अन् त्यांनी जिंकले !
By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST