शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसान मोबदल्याचे फेरसर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:37 IST

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यल्प पीक नुकसानीसंदर्भात आमदार बाळू धानोरकर यांनी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रायपूर-राजनांदगाव ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : टॉवर प्रकरणी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यल्प पीक नुकसानीसंदर्भात आमदार बाळू धानोरकर यांनी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रायपूर-राजनांदगाव ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सदर बैठकीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे फेरसर्वेक्षण करून योग्य मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले.शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक नुकसानीचा मोबदला हा अत्यल्प असून तो केव्हा मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये शांसकता होती. तसेच ट्रान्शमिशन लाईनच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे केलेल्या सर्व्हेक्षणावरती शेतकऱ्यांचा आक्षेप होता. सदर बैठकीदरम्यान उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या समक्ष पीक नुकसानीचे पुन:सर्व्हेक्षण करून त्यांना योग्य पीक नुकसान देण्याचे ट्रान्समिशन लाईनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच ट्रान्समिशन लाईनच्या तारेखालील जाणाऱ्या विहिरीच्या नुकसानीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर मोबदला देण्याकरिता मार्गदर्शन घेण्याचे मान्य केले.टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणारा मोबदला हा टप्पानिहाय देण्याचे त्यांनी मान्य केले. ट्रान्समिशन लाईन खाली येणाऱ्या पिकांचे सागवान व इतर मुल्यवान झाडांचासुद्धा मोबदला दिल्या जाईल व सर्व मोबदल्याविषयीची माहिती लवकरच उपविभागीय अधिकारी वरोरा यांना सादर करण्याचे मान्य केले. तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचा आर्थिक मोबदला थांबला होता. तीदेखील समस्या दूर करून येत्या काही दिवसातच त्यांना मोबदला देण्यात येईल असे यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीत उपविभागीय अधिकारी वरोरा प्रमोद भुसारी, तहसीलदार सचिन गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, यासोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख प्रमोद मगरे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, कामगार सेना जिल्हा प्रमुख जयदीप रोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल बदखल, वासुदेव ठाकरे, भद्रावती नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मनोज पाल, वरोरा तालुका प्रमुख देवानंद मोरे, भद्रावती तालुका प्रमुख प्रवीण बांदूरकर, विलास डांगे, राजू चिकटे, पुरुषोत्तम पावडे, पद्माकर कडूकर उपस्थित होते.