शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील वीज समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:48 IST

बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते.

ठळक मुद्देवीज अधिकाऱ्यांसोबत बैठकीत तोडगा : कृषिपंपांना वीज जोडणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते. त्याबाबत गावकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने पालकमंत्र्याच्या सूचनेप्रमाणे बल्लारपूर पं.स. समितीचे पदाधिकारी जि.प. सदस्य व वीज मंडळाचे अधिकारी यांची चंद्रपूर येथे वीज वितरण कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात तालुक्यातील वीज समस्या अग्रक्रमाने निस्तारण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता ए. व्ही. कोरेकर यांनी दिल्या.तालुक्यातील मानोरा, गिलबिली, कवडजई, किन्ही, कोर्टी, इटोली, पळसगाव आदी गावांना कोठारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु या भागात वीज वेळीअवेळी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कोठारी ते मानोरा ११ केव्ही स्पेशल फिडर लाईन टाकण्याची मागणी होती. त्यासाठी ७२ लाखांचे अंदाजपत्रक बनवून मंजूर झाले. त्या कामाच्या निवीदा मंजूर होवून लवकरच काम सुरु होणार आहे.ग्रामीण भागातील जनता ७५ टक्के शेतकरी असून शेतीवर उपजिविका करतात. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होणे व भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी अडचण होत आहे.अशात वीज खंडित होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल व रात्रीचे भारनियमन बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे सांगण्यात आले.मागील दीड ते दोन वर्षापासून कृषिपंपांना वीज जोडणी नाही. शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. परंतु कंत्राटदार निविदा भरत नाहीत. त्यामुळे वीज जोडण्यात अडथळा होत आहे. मात्र यासाठी शासनस्तरावरुन उचित कारवाई करुन वीज जोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत अधीक्षक अभियंता ए. व्ही. कोरेकर, चंद्रपूर जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी इंगोले, कार्यकारी अभियंता बल्लारपूर के. एन. पिजदूरकर, कोठारी वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एस. बी. मून, जि.प. सदस्य हरिश गेडाम, किशोर पंदीलवार, राजू बुद्धलवार, पं.स. बल्लारपूर सभापती गोविंदा पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, रमेश पिपरे, पं.स. सदस्य विद्या गेडाम उपस्थित होते.