शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:12 IST

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत यापूर्वीचा म्हणजे २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय वादग्रस्त ठरला हाेता. या जीआरप्रती शिक्षक संघटनांकडून ओरडही झाली. त्यामुळे शासन निर्णयात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली हाेती. त्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन शासन निर्णय तयार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात  नेहमी बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या पदांबाबत  ओरड हाेत असते.

ठळक मुद्देसर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष व एका शाळेत पाच वर्ष सेवेची अट

लाेकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने ३१ मे पर्यंत बदल्या करण्याबाबतचा शासन  निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने ७ एप्रिलला निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाला अधिन राहून गडचिराेली जिल्ह्यातील पात्र ५०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत यापूर्वीचा म्हणजे २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय वादग्रस्त ठरला हाेता. या जीआरप्रती शिक्षक संघटनांकडून ओरडही झाली. त्यामुळे शासन निर्णयात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली हाेती. त्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन शासन निर्णय तयार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात  नेहमी बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या पदांबाबत  ओरड हाेत असते. या भागातील शाळा दुर्गम भागात असल्याने येथे शिक्षक सेवा द्यायला तयार हाेत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते.

पाच टप्प्यांत बदली प्रक्रियाबदलीसाठी अर्ज केल्यानंतर ३० ऑप्शन (पर्याय) घ्यावे लागणार आहे. संवर्गनिहाय बदल्या हाेणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर जिल्ह्यातील रिक्त जागा दाखविल्या जातील. एकूणच पाच टप्प्यांत ही शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 

खाेटी माहिती दिल्यास शिक्षकांचे निलंबनखाेटी माहिती सादर करून संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास अशा शिक्षकांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करावी, अशी स्पष्ट तरतूद ७ एप्रिल राेजीच्या नव्या शासन निर्णयात करण्यात आली आहे. 

यांच्या हाेतील बदल्यानवीन शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनानुसार सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा व एका शाळेत पाच वर्षांची सेवा पूर्ण करणारे, तसेच अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा पूर्ण करणारे शिक्षक बदलीकरिता पात्र ठरणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या जाेडीदारास  गंभीर आजार असल्यास अशा कर्मचाऱ्यांना संवर्ग १ चा लाभ मिळणार आहे, तर संवर्ग दाेनचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा पुढील बदलीच्या वेळी एक एकक  म्हणून बदलीसाठी विचार करण्यात येणार आहे. संवर्ग १ व संवर्ग २ अंतर्गत बदली करणाऱ्यांना पुढील तीन वर्ष बदली करता येणार नाही. 

काेराेनामुळे गतवर्षी प्रक्रिया नाहीसन २०१७ व २०१८ या दाेन्ही वर्षांत चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ऑनलाईन प्रक्रिया राबवून बदलीपात्र शिक्षकांना न्याय देण्यात आले. मात्र, गतवर्षी काेराेना महामारीच्या संकटामुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया प्रशासनाला घेता आली नाही. शिक्षण विभागाने ही प्रक्रिया हाती घेण्यासाठी नियाेजन केले हाेते. मात्र, काेराेना संसर्ग वाढल्याने ही बदली प्रक्रिया रद्द करावी लागली. अनेक शाळा दुर्गम भागात या भागात शिक्षकांच्या रिक्तपदांचा अनुशेष दरवर्षी कायम राहताे. यावर्षीच्या तरी बदलीने हा अनुशेष भरून निघणार काय, असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पालकांकडून विचारला जात आहे.  

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली