शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात

चंद्रपूर : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर शहरात विकासाची मोठी मालिका भाजपाच्या माध्यमातून तयार केली. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर शहरात ग्रामीण रुग्णालय, उपकोषागार कार्यालय, ११ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना, न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा, चार कोटी रुपये किमंतीच्या नाट्यगृहाचे बांधकाम, बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या निर्मीतीचा निर्णय, बल्लारपूर-सास्ती या गावांना जोडणाऱ्या पुलाचे वर्धा नदीवर बांधकाम अशी विविध विकासाची कामे आम्ही जनतेच्या प्रेमाच्या बळावर पूर्णत्वास आणली. विकास प्रक्रियेत कधीही आम्ही राजकारण केले नाही, असे ते म्हणाले. या सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, छत्तीसगढचे माजी आमदार वीरेंद्र साहू, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, रेणुका दुबे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेटी, धर्मप्रकाश दुबे, मीना चौधरी, अ‍ॅड.रणंजय सिंह उपस्थित होते. सभेला पुष्पा डंगोरे, वर्षा सुंचूवार, येलय्या दासरप यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)