शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:54 IST

कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली.

शासन मस्त, शेतकरी त्रस्त : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत आशिष देरकर कोरपनाकोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते कापण्यात आले असले तरी पिकांचे सर्वेक्षणच न झाल्याने पीक विम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांसाठी सदर योजना असून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी देणारी योजना ठरणार असे वाटले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार असल्याचे शासनाचे प्रतिनिधीही सांगत फिरत होते. मात्र हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांचे पैसे तर गेलेच बदल्यात पदरात मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्यांना उरली नाही.शासकीय परिपत्रकानुसार विम्याचा मोबदला मिळविण्याच्या अनेक अटी आहेत. अनेक शेतकरी गरीब व निरक्षर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवावा, हे माहित नाही. बँक म्हणते म्हणून ते विमाधारी झाले. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लाभार्थी होईल याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विम्याची रक्कम पाण्यात जाईल एवढे, मात्र खरे. शासन व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये योग्य जनजागृती केली नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.कुठे गेले आधुनिक तंत्रज्ञान?या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही त्रृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, स्मार्ट फोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होता. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान कुठे गायब झाले, हा प्रश्नच आहे.४८ तासांत द्यायची होती नुकसानीची माहितीशेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास ती माहिती संबंधित विभागाच्या टोल फ्री नंबरवर ४८ तासांत द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत आहे.रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला विमाचंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कजार्तून बँकेच्या माध्यमातून रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा काढला. मात्र विम्याचा साधा पुरावा शेतकऱ्यांजवळ नसल्याने अनेक शेतकरी असुरक्षित आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मोबदला मिळतो की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पुरावा मागण्यात येणार आहे.