शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना सुविधा पुरविण्यात हयगय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढून वेकोलिने नागरी सुविधा पुरवाव्यात.   या कामात हयगय करू नये. येत्या दोन आठवड्यात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्पग्रस्त आढावा बैठकीत केली.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वेकोलि वणी क्षेत्र व्यवस्थापक आर. बी. सिंह, उपप्रबंधक रोहित मेश्राम, अधीक्षक एम. वाय. पुरटकर आदींसह देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करावी. कोळसा खाणीमुळे त्या भागात प्रदूषण होते. यासाठी पर्यावरण विभागाने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी. वेकोलिने धुळीवर दररोज पाणी टाकण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सहा महिन्यांत पुनर्वसन- पैनगंगा प्रकल्पांतर्गत  विरूर गाडे येथील ७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरित ३८ कुटुंबांपैकी १९ कुटुंबांचे पुनवर्सनस्थळी भूखंड विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदान विकल्पास मंजुरी द्यावी. प्रकल्पग्रस्तांचा हक्क  डावलू नये. पुनर्वसनाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. कोळसा खाणीमुळे शेताकडे जाण्याचे रस्ते बंद झाले. नदीचे प्रवाह बदलल्याने सर्वेक्षण करावे, अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी करावी, असेेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी  कामगारांनी अडचणी मांडल्या.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcollectorजिल्हाधिकारी