शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आठव्या दिवशीही आंदोलनाची दखल नाही

By admin | Updated: March 9, 2017 00:45 IST

गेल्या आठवड्याभरापासून भूमिहीन प्रकल्पग्रस्त न्याय मिळेल, या अपेक्षेत नोकरीसाठी वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदानीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत.

वेकोलिचे ४० कोटींचे नुकसान : प्रकल्पग्रस्त भूमिकेवर ठाममाजरी : गेल्या आठवड्याभरापासून भूमिहीन प्रकल्पग्रस्त न्याय मिळेल, या अपेक्षेत नोकरीसाठी वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदानीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत. आज बुधवारी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना येथे मात्र मोठ्या संख्येने महिला न्यायासाठी संघर्ष करताना दिसून आल्या.असे असतानाही वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे जणू पाठच दाखवली आहे. या आंदोलनात अनेक वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आठवड्याभरात वेकोलिचे १३५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले असून ४० कोटींचा फटका बसला आहे. वेकोलि माजरीच्या कार्मिक प्रबंधक त्रिपाटी यांच्या स्वाक्षरीने २५ प्रकल्पग्रस्तांची यादी नोकरीसाठी मंजूर करण्यात आली. ही यादी आंदोलनस्थळी सूचना फलकावर लावली आहे. याबाबत कार्मिक प्रबंधक त्रिपाटी यांना विचारणा केली असता वेकोलि नागपूरमधून मंजुरी मिळाल्याचे लोकमतला सांगितले. परंतु इतर शिल्लक प्रकल्पग्रस्तांबाबत विचारले असता फोन बंद करुन दिला. भूमिहीन प्रकल्पग्रस्त महिलांनी आंदोलनस्थळावर क्रांतीज्योती सावित्रीबाई व आई जिजाऊच्या प्रतिमांना समोर ठेवून त्यांना संघर्षासाठी शक्ती मागितली.(वार्ताहर)दिशाभूल करण्याचा प्रयत्न : प्रकल्पग्रस्त२५ जणांना नोकरीत समाविष्ट करण्याची सूचना फलकावर लावली. मात्र हे पत्र खोटे असून त्या पत्रामध्ये अनेक चुका आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या नावातही चुका आहेत. आदेश क्रमांक टाकलेले नाही आणि कोल इंडियाच्या वेबसाईटवर कुठेच याचा उल्लेख नाही. म्हणून ही सूचना आम्हा प्रकल्पग्रस्तांना दिशाभूल करण्याकरिता लावले असून जर २५ जणांना समाविष्ट करण्याचा आदेश आला असता तर तो आदेश आमच्या हाता दिला असता. त्यांना सूचना फलकावर लावण्याची गरज नाही. हे पत्र चुकीचे आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.