शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
4
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
5
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
6
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
7
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
8
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
9
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
10
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
11
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
12
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
13
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
14
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
15
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
16
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
17
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
18
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
19
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

आनंदवनाच्या कामात जातीपातीला थारा नाही - महारोगी सेवा समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:25 AM

आर्थिक गैरव्यवहार केल्याने सौसागडे यांना कामावरून कमी केले

वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा आमटे यांनी आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांना घेवून आनंदवनाची निर्मिती केली. तेव्हा बाबांनी आनंदवनात कुठल्याही जातीपातीला थारा दिला नाही. श्रमाला महत्त्व दिले. आजही हेच तत्व पाळले जात आहे. परंतु काही जातीपातीचा मुद्दा अकारण उपस्थित करून महारोगी सेवा समितीला बदनाम करीत आहे. आनंदवनचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी स्वत:च आर्थिक गैरव्यवहार केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे, असे महारोगी सेवा समितीने म्हटले आहे.

माजी सरपंच तथा आनंदवन ग्रामपंचायतचे सरपंच राजु सौसागडे यांचे आई-वडील आजही आनंदवनात वेगळे राहतात. त्यांची सर्व जबाबदारी महारोगी सेवा समिती घेत आहे. राजू सौसागडे व त्यांची पत्नी आनंदवनातील संस्थेच्या निवासस्थानी राहून काम करीत होते. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्यांना दमदाटी देणे, स्पेअरपार्टची चोरी करणे असे अनेक गैरव्यवहार केले आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर त्याला विश्वस्तांनी व कार्यकर्त्यांनी समजाविले. परंतु त्यांचा हा गैरव्यवहार कायम राहिला. सरपंच असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याशिवाय विश्वस्तांना भडकविणे, खोट्या गोष्टी पसरविणे, अशा अनेक बाबीमुळे त्यांना व त्याच्या पत्नीला कामावरून काढले. त्यानंतरही अशीच वागणूक सातत्याने राहिल्याने ग्रामसभेने ठराव मंजूर करून त्याला घर खाली करण्यास सांगितल्याचे महारोगी सेवा समितीने म्हटले आहे.राजू सौसागडे याला आॅक्टोबर १९ मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने कामावरून काढले. त्याच्या पत्नीलाही काढले. त्याच वेळेस त्यांना निवासस्थान सोडण्यास सांगितले. परंतु त्यांनी सोडले नाही. कोरोना काळात त्यांना काढण्याचा विचारही केला नाही. त्यांच्याविरूध्द पोलिसात तीन तक्रारी दिल्या. त्या अदखलपत्र आहे. त्यानंतरही त्यांची वागणूक सुधारली नाही. आनंदवनात जातीपातीला थारा नाही. तरीही त्यांनी यावरून प्रचंड मानसिक त्रास दिला. - डॉ. शितल आमटे-कराजगी, सीईओ, महारोगी सेवा समिती, आनंदनवन, वरोरा