शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

भ्रष्टाचार होऊनही कारवाईचा पत्ता नाही

By admin | Updated: August 29, 2015 01:25 IST

नजीकच्या नांदा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामासाठी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

साडेसात लाखांची अफरातफर : अहवाल सादर; मात्र कारवाईचा मुहूर्तच साधेना !गडचांदूर : नजीकच्या नांदा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामासाठी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. अधिकाऱ्यांकडून वारंवार चौकशीनंतर सात लाख ३७ हजार ६६५ रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला असून अफरातफर होण्यास सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी व तत्कालीन ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले. असे असताना तीन वर्ष लोटूनही दोषींवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर शंका निर्माण होत आहे.ग्रामपंचायत नांदा येथे आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत २०१०-११ या वित्तीय वर्षात आठ आंगणवाडी इमारत बांधकामासाठी दोन हप्त्यांमध्ये १० लाख ३५ हजार १९० रुपये व सन २०११-१२ या वित्तीय वर्षात २ अंगणवाडी बांधकामाकरिता ६ लाख ७१ हजार ६०८ रुपये असे एकूण १७ लक्ष ६ हजार ७९८ रुपये ग्रामपंचायत नांदाला अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झाले होते. अंगणवाडी इमारतीचे बांधकाम बाकी असताना निधीची विल्हेवाट लावल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अभय मुनोत व हारुण सिद्दीकी यांच्या लक्षात आल्यानंतर भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली. अनेकदा चौकशी करण्यात आली. चौकशीकर्त्या अधिकाऱ्यांनी ७ लाख ३७ हजारांच्या अफरातफरीचा अहवालही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र तब्बल तीन वर्ष लोटूनही कारवाई करण्यात आली नसल्याने शासकीय निधी खासगी घशात गेला आहे.अहवालामध्ये मुल्यांकनापेक्षाही जास्त निधी खर्च केल्याचे नमूद केले आहे.१० अंगणवाडी बांधकामात ग्रामपंचायतीने १८ लाख रुपये खर्च दाखविला असून ग्रामपंचायत अभिलेखात एकही प्रमाणक उपलब्ध नाही. इतका मोठा भ्रष्टाचार असताना कारवाई न केल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचार सुरुच आहे. गावातील बालाजी ले-आऊटने कसल्याही नागरी सोयी- सुविधा करण्याआधी आर्थिक व्यवहार करुन खोटे नाहरकत प्रमाणपत्र देणे, अल्ट्राटेक कंपनीकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा निधी विजेचे खांब उभारण्याकरिता ग्रामपंचायतला दिला होता. मात्र काम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला निधी दिला असून याबाबत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दिली असतानासुद्धा कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. (शहर प्रतिनिधी)