शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेच्या अंधारात रेतीची चोरी

By admin | Updated: March 18, 2015 01:16 IST

सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत.

सावली: सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.२०१२ नंतर अजुनही सावली तालुक्यातील बोरमाळा एक व दोन, साखरी, हरांबा, मोहाळ चक, सिर्सी या सहा घाटांचा लिलाव झाला नाही. महसूल प्रशासनाच्या निर्णयानुसार या सहाही घाटांच्या लिलावाची ठरविण्यात आलेले प्राथमिक किंमत लिलावधारकांच्या आवाक्याबाहेर असल्याने लिलावात बोली बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सदर घाटांचा लिलाव २०१२ नंतर आजपर्यंतही झाला नाही. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफीयांनी पहाटेच्या प्रहरापासून रेती चोरण्याचा उपद्रव अविरतपणे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शासनाला कोट्यवधीचा चुना लागला आहे. एका वर्षासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल या सहाही घाटांमधून शासनाला मिळतो. बोली रक्कम जास्त असल्यामुळे कोणी लिलावात भाग घेत नाही, ही बाब लक्षात आल्याने शासनाने निर्धारित रकमेत २५ टक्क्यांनी कपात केली आहे. तरीही लिलावात उतरण्यासाठी कोणीही कंत्राटदार धजावले नसल्याची माहिती आहे.बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर सहा रेती घाट असून येथील रेती बांधकामाच्या दृष्टीने उच्च दर्जाची मानली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात मागणी असुनही वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीची असल्यामुळे या घाटावरुन रेतीचा फारसा उपसा केला जात नाही असा समज आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या मते त्या घाटांची निर्धारीत रक्कम ही अधिकच असल्याचे सांगितले जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा रेती माफीया मोठ्या प्रमाणात घेत असतानाच कर्मचारीही आपले हितसंबंध जोपासत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगते यांनी धडक मोहीम राबवून काही ट्रॅक्टर चालकांवर दंड ठोठावला. त्यातून तीन लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. मात्र महसूल प्रशासन रेती माफीयांवर जरब बसविण्यात हतबल झाले आहे.महसूल प्रशासनातील यंत्रणा तोकडी असल्यामुळे रेती माफीयांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. प्रशासनात अनेक कामे असल्यामुळे दररोज पहाटे उठून रेती चोरट्यांचा ट्रॅक्टर पकडून त्यांना दंड ठोठावणे शक्य नाही. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर पकडण्याचा अधिकार आहे. परंतु अनेक कर्मचारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. काही कर्मचारी वैयक्तिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे मी एकटीच कुठे कुठे लक्ष देऊ आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊ अशी अगतिकता सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)