शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमी कलाकार चहा विकून, मजुरी करून करताहेत गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

कोरोना काळाने तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बॅकस्टेज हरहुन्नरी कलावंतांच्या ठणकत्या वेदना पुन्हा गहिरे झाल्या. कुणी चहाची टपरी चालवितो. कुणी मटनमासे विकतो तर कुणी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतो.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : बॅकस्टेज कलावंतांच्या वाट्याला उपेक्षाच

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मराठी रंगभूमीच्या पडद्यावर कलेचे दमदार सादरीकरण करून सिनेसृष्टीत नावलौकीक मिळविणा-या कलावंतांची संख्या मोठी आहे. मात्र, या रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंत आयुष्यभर उपेक्षेचेच धनी होतात. यातून झाडीपट्टीची रंगभूमीही अपवाद नाही.कोरोना काळाने तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बॅकस्टेज हरहुन्नरी कलावंतांच्या ठणकत्या वेदना पुन्हा गहिरे झाल्या. कुणी चहाची टपरी चालवितो. कुणी मटनमासे विकतो तर कुणी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतो. त्यांची ही भडभडती वेदना पडद्यावर दिसत नाही. पण उद्याच्या आशेवर विश्वास ठेवून चेह-याला पुन्हा मेकअपसाठी सज्ज होतो. यंदा तर हेही दिवस येणार की नाही, असा बॅकस्टेज कलावंतांचा सवाल आहे. सुनील अष्टेकर हे १२ वषार्ंपासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. ते आता चहा टपरी चालवतात. दरवषीर् १०० नाटकात काम करतात. कोरोनामुळे कलावंतांचे हाल पाहवत नसल्याने झाडीपट्टी नाट्य मंडळाकडून पालकमंत्र्यांकडे निवेदन दिले. दारिद्रयाच्या गतेतून बाहेर काढण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी केली. कलावंत पितांबर श्रीरामे यांनीही हीच व्यथा मांडली आहे.बॅकस्टेज कलावंतांवर कोरोनाने मोरघाड आलीरंगभूमीवरचा पडदा न उघडल्याने बॅकस्टेज कलावंतांचे हाल सुरू आहेत. शासनाने आता परवानगी दिली. कलावंतांचे मूळ प्रश्न जैसे-थे आहेत. कोरोनाने तर कलावंतांवर मोरघाडच (संकट) आली आहे. कुटुंब चालविणे कठीण झाले.- सुनील अष्टेकर, कलाकारकलावंतांना निवृत्ती वेतन लागू करावेरंगभूमीची सेवा करणारे कलावंत सातत्याने उपेक्षेचे धनी राहिले आहेत. वृद्धापकाळात त्यांचे हाल होतात. त्यामुळे रंगभूमीचे कलावंत व संबंधित व्यक्तींना शासनाने निवृत्ती वेतन दिले पाहिजे.- शबाना खान, ज्येष्ठ नाट्य कलावंतपतीला काम नसल्याने मजुरीला जातेझाडीपटी रंगभूमीचा आम्हाला मोठा आधार होता. कोरोनामुळे यापूवीच्या नाटकांचा हंगाम वाया गेला. यंदा हंगाम सुरू व्हायला वेळ आहे. कामे नसल्याने पतीसोबत मीदेखील इतरांच्या शेतीवर मजुरीसाठी जाते. तेव्हाच घरची चूल पेटते.-निर्मला श्रीरामे, कुटुंबीय