शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर येथेच ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

सन  १९९८ पासून चंद्रपूर येथे सुरू असलेल्या शाळा न्यायाधिकरणमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. २० मे २०२२ नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिध्द करून चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. आता कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना नागपूरला जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली येथील खाजगी माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याला संस्थेकडून बेकायदेशीर व नियमबाह्य सेवामुक्त, बडतर्फ, पदावनत सेवाज्येष्ठतेचा वाद व सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती दिली असेल तर अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) अधिनियम १९७७, नियमावली १९८१ मध्ये दिलेली आहे. सन  १९९८ पासून चंद्रपूर येथे सुरू असलेल्या शाळा न्यायाधिकरणमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. २० मे २०२२ नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिध्द करून चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. आता कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना नागपूरला जावे लागणार आहे. त्यामूळे शिक्षण क्षेत्रात  कमालीचा  असंतोष पसरला आहे. त्यामुळे शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर येथे ठेवावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे.शाळा न्यायाधिकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्याची संख्या वाढत आहे. अनेकदा पीठासीन अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतात. त्यामूळे न्याय मिळण्यासाठी बराच कालावधी जातो. प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपना, जिवती या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातून नागपूरसारख्या ठिकाणी वारंवार जाण्या-येण्यात मानसिक त्रास ,वेळ आणि पैशाचा भुर्दड सोसावा लागणार आहे. या निर्णयाचा फेरविचार करून चंद्रपूर, वर्धा,गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्वात असलेले शाळा न्यायाधिकरण कायम ठेवावे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे  प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी  राज्य शासनाला पाठविले आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र