शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखापरिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महसूल विभागाशी निगडित सामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोनदिवसीय महसूल परिषद नुकतीच पार पडली. यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात महसूल विभागातील महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना महसूल परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे,  तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली), नयना गुंडे (गोंदिया) उपस्थित होते.या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘जमीनविषयक कायद्यातील तरतुदी व सुधारणा’ तसेच ‘अर्धन्यायिक कामकाज’ याबाबत दोन सत्रांत महसूल यंत्रणेला मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखापरिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी