शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचा अभिमान! प्रणय जनबंधू बनले भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर

By राजेश भोजेकर | Updated: June 23, 2025 12:42 IST

IIT इंजिनीअर ते फ्लाइंग ऑफिसर : प्रणय जनबंधू यांची प्रेरणादायी वाटचाल

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सुपुत्र प्रणय जितेंद्र जनबंधू यांनी आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय वायुसेनेत (Indian Air Force) फ्लाइंग ऑफिसर या मानाच्या पदासाठी यशस्वी निवड होऊन चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रणय जनबंधू हे चंद्रपूर शहरातील पडोली परिसरातील साई रेसीडेंसी येथील रहिवासी असून त्यांचे वडील जितेंद्र जनबंधू आणि आई निता जनबंधू हेही समाजसेवेत सक्रिय आहेत. वडिलांची देशसेवेची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार प्रणय यांनी लहानपणापासूनच मनाशी बाळगला होता.

प्रणय यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी हायस्कूल, दुर्गापूर येथे झाले असून बारावीचे शिक्षण IIT होम, नागपूर येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी IIT रुडकी (उत्तराखंड) येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. बंगलोर येथील खाजगी कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांनी भारतीय वायुसेनेच्या AFCAT (Air Force Common Admission Test) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरुवातीपासूनच स्व-शिक्षणाद्वारे केली आणि पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले.

AFCAT परीक्षेत त्यांनी 2 AFSB, मैसूर या निवड मंडळातून सहभागी होत ऑल इंडिया रँकिंगमध्ये AIR – 79 प्राप्त करत फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी पात्रता मिळवली आहे. कोणतेही कोचिंग न घेता, केवळ स्वतःच्या प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

प्रणय यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब बनली आहे. IIT सारख्या संस्थेतून शिक्षण घेऊनदेखील देशसेवेचे स्वप्न साकार करण्याची त्यांची तळमळ सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रणय जनबंधू हे निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर