शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

घरातील कर्ताधर्ता माणूस गेला, मदत तरी वेळेवर मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्यात आदेश दिले. दरम्यान, वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

 त्रुट्यांमुळे ३९५ अर्ज बाद      - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही वारसदारांनी मदतीसाठी अर्ज केले. - जिल्ह्यातील ३९५ अर्ज विविध त्रुट्यांमुळे बाद झाले आहे. - या अर्जदारांनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयात  मदतीसाठी पायपीट सुरु केली आहे.

यामुळे अडली वारसांना मदत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या संबंधित वारसदारांनी अर्ज केले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदत मिळाली नाही. यामध्ये वारसदारांमधील वाद, नेमका मृत्यू कोरोनाने झाला का,यासंदर्भात पुरावा नसणे आदी कारणामुळे मदत अडली आहे.

मदत कधी मिळणार?

मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र  अजूनही मदत मिळाली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत त्वरित केल्यास कुटुंबांना आधार मिळेल. जिल्ह्यातील अनेकांचे प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र खात्यात पैसे आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.  तर काहींनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात चकरा मारल्या असून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहरातील अर्ज अधिक- जिल्ह्यातून मदतीसाठी प्राप्त अर्जापैकी शहरी भागातील तसेच मनपा क्षेत्रातील अर्ज सर्वाधिक आहे. तर काहींनी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज सादर केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना