शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन

By admin | Updated: November 29, 2015 01:50 IST

सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि वाचकवर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो, त्या लोकमत कालदर्शिकाचे प्रकाशन येथील लोकमतच्या जिल्हा कार्यालयात आज शनिवारी दुपारी थाटात झाले.

चंद्रपूर : सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि वाचकवर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो, त्या लोकमत कालदर्शिकाचे प्रकाशन येथील लोकमतच्या जिल्हा कार्यालयात आज शनिवारी दुपारी थाटात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द ज्योतिष्याचार्य तथा ग्रहांकित जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी गोविंदराव राजकोंडावार, मंदाश्री पुरस्काराच्या मानकरी ज्योतिष्याचार्य मेघा राजकोंडावार, यंग इंडिया बुकस्टॉलचे संचालक मोहम्मद फारुख, बजाज कॅपिटलचे ब्रँच हेड मनीष यादव, लोकमतचे वितरक जितेंद्र चोरडिया, रमण बोथरा, लोकमत नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी (ग्रामीण) गणेश खवसे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोपालकृष्ण मांडवकर यांनी लोकमत कालदर्शिकेचा प्रवास व परंपरेवर प्रकाश टाकला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते कालदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्योतिषाचार्य राजकोंडावार म्हणाले, लोकमत कालदर्शिका हे केवळ एक कॅलेंडर नसून ते एक पंचांगच आहे. पूर्वी पंचांग घटीवर आधारित लिहिले जायचे. त्यामुळे सर्वसामान्यांना ते समजणे कठीण होते. आता पंचांग तासावर आधारित लिहिले जाते. त्यामुळे पंचांग पाहणे सोपे झाले आहे. लोकमत कालदर्शिकेतील लेखही वाचनीय असतात. यामुळेच लोकमतची कालदर्शिका अल्पावधीत घराघरात पोहचली, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. अशोक बोथरा यांच्यासह इतर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे तर आभार संतोष कुंडकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)आठवणींना उजाळाज्योतिष्याचार्य गोविंदराव राजकोंडावार यांनी कार्यक्रमात बाबूजींशी असलेल्या स्रेहबंधाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लोकमतच्या स्थापनेपासून तर २००३ पर्यंत लोकमतमध्ये आपण अखंडपणे दैनिक व साप्ताहिक राशिभविष्य लिहिले. बाबूजींच्या आग्रहावरून आपण सातत्याने लिहीत होतो. त्या काळात त्यांच्याशी वाढलेला ऋणानुबंध आजही लोकमतशी कायम असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.