शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर येथे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 01:01 IST

पोलीस मुख्यालय येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१६ चे आज रोजी

फुगे सोडले आकाशात : नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचंद्रपूर : पोलीस मुख्यालय येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१६ चे आज रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम उपस्थित होते.विशेष पोलीस महानिरीक्षक कदम यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून व उद्घाटन सोहळ्याचा शुभसंदेश म्हणून आकाशात फुगे उडवित क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांना पोलीस खेळाडूद्वारे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खेळाडूचे पथसंचलन व शपथ विधी पार पडला.प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कदम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पुढे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊन नागपूर परिक्षेत्राचे नाव सर्व क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात अव्वल राहील, अशी खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त केली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी देवेंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक मधु शिंगे, आय.ए.एस. अधिकारी अमन मित्तल, चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जि.प. सभापती देवराव भोंगळे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उद्घाटनपर सामन्यांमध्ये २०० मीटर धावण्याची (पुरूष व महिला) स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुरूषांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील लाला कोटनाके यांनी व महिलांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सुनैना डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)