कोठारीत निदर्शने : तरुणांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजलीकोठारी : काश्मीरमधील जवानांच्या कॅम्पवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोठारीतील तरुण व नागरिकांनी बसस्थानकासमोर पाकिस्तानचा व दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला. व शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ज्या जवानांच्या कामगिरीने व सर्तकतेने समस्त देशवासी सुरक्षित आहेत. त्यांच्या कार्यानेच भारतीयांना मोकळा श्वास घेणे शक्य आहे. ते जवान सीमेवर सुरक्षा देत असताना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रात्रीच्या दरम्यान भ्याड हल्ला केला. त्यात १८ जवान शहीद झाले.आदरांजली कार्यक्रमाच्या वेळी ठाणेदार देवेंद्र ठाकुर, ग्रा.प.सदस्य मोरेश्वर लोह,े भारिप बमस युवा जिल्हा महासचिव धिरज बांबोळे, तंमुस अध्यक्ष लखन उराडे, निलेश खोब्रागडे, राहुल रामटेके, सचिन रायपूरे, शैलेश तोडे, विवेश रामटेके, संदीप मावलीकर, मल मेश्राम, अनिल वनकर व सुरेश रंगारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर )सैनिक मित्रांकडून निषेधजम्मू काश्मीर येथील सैनिकांच्या मुख्यालयावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे १८ जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध शहरातील सैनिकमित्र ग्रृपच्या वतीने करण्यात आला. यावेळी शहरातील शहीद योगेश डाहुले चौक येथे सर्वजण एकत्रीत होऊन पाकिस्तानचा तिव्र शब्दात घोषणा देऊन निषेध केला. यावेळी आकाश नामेवार गौरव मुडे, शुभम बदखल,शाहरुख शेख, सुरज डोंगरे, राकेश प्रसाद, स्नेहल करकाडे, मोहन कावळे, सुरज साखरकर, मलिंदार सिंग ठाकूर, स्वप्नील डाहुले अक्षय राणे, मारोती वाघ, प्रतीक किटे आदी सैनिक मित्र उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 25, 2016 01:28 IST