शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

देश महासत्ता होण्यासाठी सर्व भेद संपुष्टात आणा

By admin | Updated: January 23, 2016 01:20 IST

देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस,

शिवराय कुळकर्णी : युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमालाभद्रावती: देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस, एकसंघ समाजाची निर्मिती करण्याची आज गरज असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते तसेच व्याख्यानकर्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.लोकसेवा मंडळ, भद्रावतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोहानिमित्त स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे हे १० वे वर्षे आहे.याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार नागो गाणार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरदचंद्र सालफळे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहर पारधे, शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार, प्राचार्य विनोद पांढरे उपस्थित होते.पुढे बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यात भारताच्या अवनतीची काही प्रमुख कारणे सांगितली. त्यातील दोन प्रमुख कारणांचा संदर्भ आजही लागू पडतो. महिलांची स्थिती अधिकाअधिक सुधारुन त्या सक्षम होणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे. भेदभावयुक्त समाज हे आजच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे. यावर आजही विचार केला तर आम्ही मानसिकतेच्या पातळीवर बदलले आहोत का, असा प्रश्न याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला.शनिदेवाच्या चौथऱ्यावर एखादी महिला चढते व समाज आकांततांडव करायला लागते, या घटनेवरुन आमचा आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकान काय आहे, हे स्पष्ट होते. स्वामी विवेकानंदानी समरस समाज निर्मितीसाठी भरीव प्रयत्न केले. रुढी, परंपरा, कुप्रथा मोडीस आणून भारताच्या संस्कृतीच्या आधारे जगात ममता व बंधूभाव स्थापित केला जावू शकतो, हा त्यांचा दृढ विश्वास होता. किंबहुना त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर ते सिद्धच करुन दाखविले. आजही भोगवादाच्या आहारी गेलेले देश विस्फोटकावर आरुढ झाले आहेत. त्यावर केवळ भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक विचार हाच एकमेव उपाय असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच संपूर्ण जगाच्या आशा भारताकडे केंद्रीत झाल्या आहेत, असे ते म्हणाले. धर्मातील शास्वत काय व परिवर्तनीय काय, याचा धर्ममार्तडांनी व समाज धुरीणांनी एकत्रीत येवून विचार केला पाहिजे व कालसंगत बदलही घडवून आणले पाहिजे. समाजाच्या उत्कर्षासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आज समाजाला अशा प्रकारच्या व्याख्यानमालेची गरज आहे. त्यातून बोध घ्यावा. भारतीय संस्कृतीची ओळख विसरत चालल्याची खंत कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. नागो गाणार यांनी व्यक्त केली. विवेकानंदाचे विचार प्रेरणादायी ठरु शकतात. म्हणून ते सर्वांनी आत्मसात करावे, असे ते म्हणाले, कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेश परसावार, प्रास्ताविक प्राचार्य विनोद पांढरे तर आभार अविनाश पाम्पट्टीवार यांनी मानले. व्याख्यानमालेच्या सुरुवातीला शारदास्तवन, स्वागत गित तसेच स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आधारित गौरवगीत झाले. ९ वीची विद्यार्थिनी मोनाली बतकी हिने स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव गुंडावार, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विश्वनाथ पत्तीवार, उपप्राचार्य रेखा पवितवार, पर्यवेक्षक गोपाल ठेंगणे, पर्यवेक्षक चंद्रकांत देशपांडे तसेच मोठ्या प्रमाणात श्रोता वर्ग उपस्थित होता. (तालुका प्रतिनिधी)