शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सिनर्जी वर्ल्ड वसाहतीत हत्या बंगाली कॅम्पात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

या हत्येची वार्ता पोहचताच बंगाली कॅम्प चौकात संतप्त नागरिकांचा जमाव झाल्याने पोलिसांची दमछाक झाली होती. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मनोज मंगळवारपासून घरीच परतला नाही. त्याची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले. घटनास्थळी मृतक मनोजच्या मृतदेहावर एकही वस्त्र नव्हते. यावरून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देनगरसेवक अजय सरकारसह दोघे ताब्यात : चंद्रपूरातील चवथी हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरसह जिल्ह्यात खूनाच्या घटनांचे सत्रच सुरू झाले आहे. पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसारा येथे सिनर्जी वर्ल्ड वसाहतीतील एका फ्लॅटमध्ये बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेल्या इसमाची कुºहाडीचे घाव घालून निर्घूण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मनोज अधिकारी (३८) रा. बंगाली कॅम्प असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बंगाली कॅम्प प्रभागाचे अपक्ष नगरसेवक अजय सरकारसह रवींद्र बैराखी या दोघांना ताब्यात घेतले असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले.या हत्येची वार्ता पोहचताच बंगाली कॅम्प चौकात संतप्त नागरिकांचा जमाव झाल्याने पोलिसांची दमछाक झाली होती. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मनोज मंगळवारपासून घरीच परतला नाही. त्याची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले. घटनास्थळी मृतक मनोजच्या मृतदेहावर एकही वस्त्र नव्हते. यावरून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलले जात आहे. सिनर्जी वर्ल्ड वसाहतीत मनोजचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट आहे. त्याच फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटना उघड होताच तपासाची चक्रे फिरवून संश्यित म्हणून दोघांना ताब्यात घेतले आहे. मनोज हा सेवाभावी वृत्तीचा असल्याने त्याची बंगाली कॅम्प परिसरात चांगली प्रतिमा होती. मनोजची हत्या झाल्याचे माहिती होताच बंगाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला. रामनगर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. रात्रीउशिपर्यंत रामनगरचे सहायक पोलीस निरीक्षक उगेवार, पोलीस निरीक्षक मोरे घटनास्थळाचा पंचनामा करीत होते.हत्येच्या घटनांनी चंद्रपूर हादरलेआठ दिवसांत चंद्रपूर शहरातील चवथा व जिल्ह्यातील आठवी हत्येची घटना आहे. नवे पोलीस अधीक्षक रूजू झाल्यापासून हे हत्येच्या घटनांचे सत्र सुरू झाल्याने त्यांचे लक्ष या घटनांकडे वळले आहे. मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांसह गुन्हेगारी प्रवृती फोफावल्याचा परिणाम याघटनांमुळे पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. या घटनांची चंद्रपूर हादरले आहे.

टॅग्स :Murderखून