अत्याचार व खून प्रकरण : आरोपीला पकडण्याची मागणीचंद्रपूर : तालुक्यातील आवाळगाव शेतशिवारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना रविवारच्या रात्री उघडकीस आली. मृतदेह चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी आणल्यात आले. यावेळी नातेवाईक तसेच जोपर्यंत जिल्हा अधिक्षक रुग्णालयात येत नाही, व तपासाची दिशा सांगत नाही. तोपर्यंत मृतदेह न उचलण्यांचा चंग बांधल्या त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील राजेंद्र दुमाने यांचे शेत गावापासून दोन ते अडीच किलो मीटर अंतरावर आहे. सध्या धानपीक कापणीला वेग आलेला आहे. परंतु राजेंद्र दुमाने या व त्यांची पत्नी हिंगणघाट येथे सोयाबीन कापणीसाठी रोजंदारीने गेले होते. त्यामुळे त्यांची मुलगी मृतक काजल (१७) दुपारच्या वेळेस शेतावर धानकापण्यासाठी गेली. त्यावेळी अज्ञात आरोपीने काजलवर अतिप्रसंग करून जिवानिशी ठार केले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपुरात आणल्यानंतर नातेवाईकांनी व चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवक राजेंद्र वैद्य, नगरसेवक नंदू नागरकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, शिवसेनेचे किशोर जोरगेवार, सुरेश पचारे, योगेश दुधपचारे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी जोपर्यंत जिल्हा अधीक्षक रुग्णालयात येत नाही व तपासाची गती सांगत नाही. तोपर्यंत प्रेत न उचल्याचा हेका धरला. त्यामुळे रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाची स्थिती बघून दंगा नियंत्रण पथकालासुद्धा प्राचारण करण्यात आले. यावेळी ठानेदार ताजणे, डीवायएसपी प्रल्हाद गिरी त्यानंतर जिल्हा अधीक्षक संदीप दिवान यांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून फासीपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मुतदेह उचलला. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव
By admin | Updated: October 25, 2016 00:35 IST