शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ज्‍युबिली हायस्‍कुल नुतनीकरण कामाच्या निविदा आठ दिवसात प्रकाशित कराव्‍या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST

चंद्रपूर : ज्‍युबिली हायस्‍कूल चंद्रपूरचे नुतनीकरण, वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम या विकासकामांच्‍या निविदा येत्‍या आठ दिवसात प्रसिध्‍द ...

चंद्रपूर : ज्‍युबिली हायस्‍कूल चंद्रपूरचे नुतनीकरण, वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम या विकासकामांच्‍या निविदा येत्‍या आठ दिवसात प्रसिध्‍द करुन अंतिम करण्‍याच्‍या सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिल्‍या.

महाकाली मंदिर परिसराच्‍या विकासासंदर्भात पुरातत्‍व विभागाच्‍या परवानगीसाठी येत्‍या १५ दिवसात नवी दिल्‍लीत केंद्रीय सांस्‍कृतिक कार्यमंत्र्यांसह बैठक घेऊन तोडगा काढण्‍यात येईल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. माझ्या मंत्रिपदाच्‍या कार्यकाळात मंजूर ही विकासकामे माझ्या दृष्‍टीने अतिशय महत्‍वपूर्ण व जिव्‍हाळयाची आहेत, ती आपण पूर्णत्‍वास नेणारच, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.मंजूर विकासकामांचा आढावा घेण्‍याच्‍या दृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक्षक अभियंता सुषमा सारखरवाडे यांच्‍यासह बैठक घेतली.

श्री महाकाली मंदिर देवस्‍थान परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी अंदाजे ६० कोटी रु. निधी १९ सप्टेबर २०१९ रोजी मंजूर झाला असून स्‍थापत्‍य अंदाजपत्रकास तांत्रिक मान्‍यता प्राप्‍त आहे. पुरातत्‍व विभागाच्‍या परवानगीसाठी प्रस्‍ताव फेर सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती अधिक्षक अभियंता यांनी दिली.

ज्‍युबिली हायस्‍कुलचे नुतनीकरण व वीर बाबुराव शेडमाके स्‍टेडियम तयार करणे या विकासकामांसाठी निविदा प्रकाशनाची कार्यवाही सुरु असल्‍याचेही अधिक्षक अभियंता यांनी सांगितले.