शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुली स्थगितीचा लाभ १० तालुक्यांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:07 IST

खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. दरम्यान, सरकारने शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले त्याचेही पुनर्गठनही होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : पीक कर्जाचेही होणार पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. दरम्यान, सरकारने शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले त्याचेही पुनर्गठनही होणार आहे.खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील दहा तालुक्यांना सर्वात मोठा फटका बसला होता. पिकांचे उत्पादन न झाल्याने कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेकडून खरीप हंगामाकरिता कर्ज घेतले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीचा तगादा लावल्याने याचा अनिष्ट परिणाम रब्बी हंगामावरही होण्याचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, २३ आॅक्टोबर २०१८ ला राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दहा तालुके दुष्काळग्रस्त निकषात पात्र ठरले. परंतु, कर्जाचे पुनर्गठन होणार की नाही, हा प्रश्न भेडसावत होता. राज्य शासनाने शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.लाभार्थी तालुकेपीककर्ज वसुलीच्या स्थगितीचा लाभ दहा तालुक्यांना मिळणार आहे. यामध्ये भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही, वरोरा तालुक्यांचा समावेश आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी व सहकारी बँकांनी तत्काळ कार्यवाही केल्यास रब्बी हंगामातील अडचण दूर होऊ शकते.३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वसुलीला स्थगितीपीककर्जाच्या व्याजासह पुनर्गठन करण्यासोबतच खरीप २०१८ हंगामातील कृषी कर्जाच्या वसुलीला ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्थगिती देण्यात आली. याशिवाय अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात (कालावधी ५ वर्षे) पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या बाधित गावांतील शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन कर्जाचे व्याजासह पुनर्गठन केल्या जाणार आहे.