शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या निकषावर तेली समाजाला आरक्षण हवे

By admin | Updated: August 7, 2014 23:53 IST

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या

आठ टक्क्यांची मागणी : समरित यांचे निवेदनचंद्रपूर : राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता या आरक्षणातून समाजाला पूर्ण न्याय मिळत नसल्याने तेली समाजाला आठ टक्के आरक्षण दिले जावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश समरित यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. ज्या समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास झाला नाही, अशा समाजाचा दर्जा उंचाविण्यासाठी आरक्षण देण्याची घटनेत तरतुद आहे. मात्र अलिकडच्या काळात मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून आरक्षण दिले जात असल्याने अन्य समाजघटकांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात मागस घटकांसमोर अंधकारमय आयुष्य जगण्याची पाळी येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने अलिकडेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. राज्याची एकूण लोकसंख्या ११.८७ कोटी आहे. यात सर्वाधिक लोकसख्या अनुसूचित जातीची, त्यानंतर मराठा व कुणबी समाजाची आहे. १९६२ ते २०१४ या काळात मराठा समाजाचे अनेक आमदार निवडून आले. याच काळात तेली समाजाचेही आमदार निवडून आले. मात्र मराठा आमदारांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. यामुळे तेली समाजाला आपला विकास साधता आला नाही. या समाजाच्या आर्थिक विकासाठी किमान आठ टक्के आरक्षण द्यावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)