शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाची दारू, महाराष्ट्राचा पैसा

By admin | Updated: May 15, 2016 00:39 IST

राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुका तेलंगणा राज्यास लागून व दारू वाहतुकीस रेल्वे व राज्य मार्गाने सहज सोपे असल्यामुळे...

विक्रेत्यांच्या संख्येत वाढ : अंकुश लावण्यात पोलीस असमर्थराजुरा : राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुका तेलंगणा राज्यास लागून व दारू वाहतुकीस रेल्वे व राज्य मार्गाने सहज सोपे असल्यामुळे पुरवठा व विक्री जोमात सुरू आहे. त्यावर नियंत्रण देखरेख व कारवाई करणारे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पुरवठा व विक्रीच्या धंद्यात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे शासनाच्या दारूबंदीचा आदेश निष्प्रभ झाला असल्याची चर्चा आम जनतेत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांच्या अथक प्रयत्न व संघर्षातून दारूबंदीचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीच्या काळात दारूबंदी करण्यास पुढाकार घेण्याचे आश्वस्थ केले होते. त्यानुसार शासन दरबारी पाठपुरावा करून दारूबंदी केली. दारूबंदीमुळे दारू सम्राट हताश झाले. त्याच्या कमाईचे साधन बंद झाले. त्यामुळे संतप्त दारू सम्राटांनी बंदीचा निर्णय रद्द करण्यासाठी बरीच पायपीट केली. परंतु शासनाचा निर्णय हा जनतेच्या मागणीवर करण्यात आल्यामुळे मुठभर दारू सम्राटांच्या प्रयत्न असफल झाला. मात्र आता गावोगावी काही लोकांनी दारू विक्री अल्पवेळेत कमाईचे साधन बनल्यामुळे यात सहभागी होवून अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. तेलंगाणा राज्यातील परवानाधारक दुकान सिमेलगत असल्यामुळे व तेथील दारूचा दर फारच कमी असून मोठ्या प्रमाणात दारूची आयात करून पैसा कमाई होत असल्यामुळे हजारोच्या संख्येत दारू विक्रेते बनले आहे. यात नियमीत वाढ होत आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवर महाराष्ट्र पोलिसांची थातूरमातूर देखरेख सुरू आहे. दररोज चारचाकी, मोटार सायकल व रेल्वे मार्गाने शेकडो पेटी दारूची वाहतूक केली जात आहे. परंतु पोलिसांना दिसून येत नाही. बहुतेक गावात तेलंगणातील दारूच्या रिकाम्या बॉटल कुठून येतात, याचा शोध पोलीस घेत नाहीत. प्रत्येक गावात तंटामुक्ती समित्या आहेत. पोलीस पाटील व कोतवालसुद्धा आहेत.दारू विक्रीचा व्यवसाय लपून छपून करणे अवघड आहे. ज्या घरातून किंवा दुकानातून दारू विक्री होते. तेथे लोकांची गर्दी असते. गर्दी असल्याचे कारण किंवा माहिती जाणून घेणे पोलीस पाटील व पोलीसांचे आहे. ही सर्व माहिती घेतली जाते. परंतु व्यवसाय बंद केला जात नाही. त्यात पुन्हा भर टाकली जाते. त्याला पाहून रिकामटेकडे सक्रीय होतात व दारूचा महापूर वाहतो.पोलिसांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून दारू विक्रीवर आळा घालण्याचे निश्चित केल्यास अवघ्या तीन दिवसांत गावातून दारू हद्दपार होवू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी पोलिसांनी निर्धार करणे आवश्यक आहे. त्यांची मनस्थिती बनली पाहिजे. माझ्या बिटात, माझ्या ठाण्याच्या हद्दीतील गावात दारू विक्री करून देणार नाही असे ठरविल्यास गावातून दारू हद्दपार होईल. यासाठी कार्यरत पोलिसांनी पुढाकार घेतल्यास दारूबंदी यशस्वी होवू शकते.सध्या तेलंगणाची दारू व महाराष्ट्रातील जनतेचा पैसा असा व्यवसाय सुरू आहे. तेलंगणातील दारू परवानाधारक मालामाल होत आहे. दारूबंदीचा निर्णय तेलंगणा राज्यासाठी लाभदायक ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)