शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती येथे ग्रीनफिल्ड एयरपोर्टला तांत्रिक मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:24 IST

शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केली. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकारखानदारांचा विमान प्रवास होणार सोईचा

आनंद भेंडेचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट तयार करण्याचा मार्ग सूकर झाला आहे. शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केली. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे वीज, सिमेंट, कोळसा, लाकूड, लोखंड, पेपरमील, आयुध निर्माणी असे विविध प्रकारचे कारखाने आहेत. या सर्व कारखान्याचे संचालन मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बंगरुळ, अहमदाबाद येथून चालते. त्यांना येण्या-जाण्यासाठी विमानाची सोय नसल्यामुळे जाणे येणे फारच अवघड ठरत आहे. त्यामुळे बरेच कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक नाहीत. कारखानदार संचालकांना जाणे येणे करण्यासाठी विमान किंवा त्यांचे खासगी हेलीकॉप्टर असतानासुद्धा विमानतळाची सोय नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही बाब राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळाची निर्मिती करण्यासाठी पाऊल उचलले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात शासनाची जमीन कोठे उपलब्ध आहे, याचा शोध घेतला व राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे एक हजार चाळीस एकर जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाच्या भारतीय विमान प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला. त्यानुसार शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन जागेची पाहणी केली. नुकताच त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून दोन टप्यात काम करण्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात ७२० एकर जमिनीची आवश्यकता असून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १२० एकर जागा, अशी एकूण ८४० एकर जमीन लागणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळताच मूर्ती येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टमुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली व तेलंगणातील आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियल येथील लोकांना विमान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन जागेची पाहणी केली आहे. नुकताच त्यांचा अहवालही प्राप्त झाला असून शासनाची संपूर्ण मान्यता मिळताच एअरपोर्टचे काम सुरू होणार आहे.-रवींद्र होळी,तहसीलदार, राजुरा.

टॅग्स :airforceहवाईदल