शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

गणेश मंडळांना वीज जोडणीसाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:07 IST

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व ४ रुपये ३१ पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली....

ठळक मुद्देमहावितरणचा उपक्रम : अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व ४ रुपये ३१ पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने एक पथक गठित केले आहे.गणेश मंडळांना सहजपणे वीज जोडणी मिळावी याकरिता महावितरणद्वारे विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक ठिकठिकाणी गणेश मंडळांना भेटी देवून, वीज जोडणी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहेत. ७८७५७६१३२२ व ७८७५७६११९५ या क्रमांकांवर संपर्क साधून गणेश मंडळांना आॅन द स्पॉट वीजजोडणी गणेमंडळाच्या ठिकाणीच मिळू शकणार आहे.गणेश मंडळांना त्यांच्या दारी आॅन द स्पॉट तात्पुरती वीजजोडणी गणेशोत्सवाच्या काळात, मिळण्यासाठी या पथकांद्वारे ए-१ फॉर्म गणेश मंडळांना उपलब्ध करून देणे व भरून घेणे, टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून देणे व वीज जोडणीसाठी लागणाºया शुल्काची डिमांड देणे इत्यादी मदत या पथकाद्वारे करण्यात येणार आहे. विजेचा अनधिकृत वापर हा धोकादायक असतो व त्यामुळे जीवित अथवा आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे विजेच्या अनधिकृत वापरावर हे पथक विषेश लक्ष ठेवणार आहे.चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे यांच्या हस्ते गणेश मंडळ वीज जोडणी पथकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय जिझिलवार, अविनाश कुरेकार, उपकार्यकारी अभियंता समीर टेकाडे, व्ही. एम. हेडाऊ, नितेश ढोकणे, विष्लेश लांजेवार, सहायक अभियंता वैशाली, बंटी चव्हाण आदी यांच्यासह वीज कंपनीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.नवीन वीज जोडणीकरिता घरपोच सेवाचंद्रपूर : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन आॅन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे. नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.