सुधाकर अडबाले : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व मागण्याच्या संदर्भात वेळोवेळी आंदोलन करून त्यांना न्याय देण्याच्या समर्थनार्थ प्रयत्न करीत आहे. त्यांच्या अनेक मागण्या निकाली काढून यशस्वी आंदोलन केले असल्याचे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय कार्यकारिणीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले.६ फेब्रुवारीला दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत विदर्भ माध्यमिक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध समस्या व मागण्यासाठी धरणे व निदर्शने आंदोलन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (माध्य.) कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, जिवती, पोंभुर्णा, मूल तालुक्यातील बहुसंख्येने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी धरणे व निदर्शने आंदोलनात शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रा. विजय हेलवटे, अवधूत कोटेवार, श्रीहरी शेंडे, दिगांबर कुरेकार यांनी मार्गदर्शन केले.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय कार्यकरिणीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शासनाच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध केला. शासन वेळोवेळी जी.आर. काढतात पण जी.आर. अध्यादेश म्हणजे कायदा नव्हते. शासनानी विद्यार्थी व शिक्षक हित लक्षात घेवून निर्णय घ्यावा अन्यथा शिक्षक संघटना विरोध करेल. असे प्रतिपादन सुधाकर अडबाले यांनी केले. ६ फेब्रुवारीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात धरणे व निदर्शनाच्या आंदोलनाचे आयोजन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे प्रतिनिधी दिघोडे अधिक्षक यांना शासनाला पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विमाशी संघ कटिबध्द
By admin | Updated: February 9, 2016 00:51 IST