शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची फरफट

By admin | Updated: November 27, 2014 23:33 IST

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात आजही फरफट सुरूच आहे. दहा वर्षांचा काळ लोटूनसुद्धा सानुग्रह अनुदान किंवा पगारही त्यांच्या पदरात नाही.

देवाडा (खुर्द) : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात आजही फरफट सुरूच आहे. दहा वर्षांचा काळ लोटूनसुद्धा सानुग्रह अनुदान किंवा पगारही त्यांच्या पदरात नाही. या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोकरी व्यतिरिक्त फावल्या वेळेत इतरत्र कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. पोंभूर्णा तालुक्यात एकूण १२ शाळा असून यात नऊ शाळा अनुदानित तर तीन विनाअनुदानित आहेत. ग्रामीण भागात प्रत्येकाला शिक्षण मिळावे. यासाठी शासनाने विनाअनुदान तत्वावर मोठ्या प्रमाणात शाळांना मान्यता दिली. आजतागायत १० वर्षे उलटली. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्यावर पोहोचली. २० ते २५ हजार रुपये मासिक वेतन मिळवित असल्याचे ते आजही गावात आल्यावर शिक्षकांना अभिमानाने सांगतात. मात्र विना अनुदानित शाळांमधील शिक्षक अद्यापही आर्थिक विंवचनेतून बाहेर पडले नाही. कुणी सकाळी गावात पानटपरी व इतर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, असे भीषण वास्तव्य त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. शाळेला आज ना उद्या अनुदान मिळणार, या आशेवर त्यांचे जगणे सुरू आहे. शासनाने २००९ मध्ये ‘कायम’ शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु २०१४ वर्ष संपायला आले तरी शिक्षण विभागाच्या टोलवा-टोलवी धोरणामुळे कुठलेच अनुदान शाळापर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी जिल्ह्यातील कित्येक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वेठबिगार झाले आहेत.पूर्वी खेड्यापाड्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होते. मात्र ग्रामीण भागात लहान-मोठ्या खेडेगावामध्ये विनाअनुदानित शाळा सुरू झाल्याने प्रत्येक गावांत शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. १० वर्षांपासून कायम नोकरीत संधी मिळेल, या अपेक्षेने काम करणाऱ्या शिक्षकांना वेळेत पगार मिळत नसल्याने संसाराला हातभार लावण्यासाठी पहाटे उठून गावात इतरत्र मिळेल ते काम करावे लागत आहे.ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण देऊन घडविले ते कमवतेही झाले. परंतु आजही विनाअनुदान शाळेला अनुदान मिळाले नाही. केवळ तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने त्यांची ही होणारी फरफट केव्हा थांबणार असे अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)