शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षाकाळात शिक्षकांचे असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:58 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांकडे कानाडोळा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्या सोडवणुकीसाठी विजुक्टा व महासंघाने अनेकदा आंदोलन केलीत. मात्र, प्रत्येक वेळेस आश्वासन देण्यात आले. संघटनेने विद्यार्थी हितासाठी मार्च २०१७ चे आंदोलन शिक्षमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मागे घेतले. त्यानंतर झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यात. मात्र लेखी आश्वासनांची पूर्तता केली नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अत्यंत उर्मटपणे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. २१ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत अन्यायकारक शासनादेश काढला. शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी शिक्षण व्यवसायिक देशधडीला लावली. जुनी पेन्शन योजना रद्द करून शिक्षकांचे भवितव्य अंधारकायम केले. ३१ आॅक्टोबर २००४ ला एक शासनादेश काढून जुनी पेन्शन योजना बंद केली. ज्याचा विधिमंडळात कायदाही केला नाही. अशा बेकायदेशिर निर्णयामुळे शासनाच्या विरोधात शिक्षकांत असंतोष पसरलेला आहे. मागील चार वर्षात सरकारने शिक्षकांसाठी कोणतेही चांगले निर्णय घेतले नाही. त्यामुळे राज्य महासंघ व विजुक्टाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन, मुकमोर्चा व परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष. प्रा. अशोक पोफळे, प्रा. धनंजय पारके, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. रवी जोगी. प्रा. बहादे, प्रा. विजय तराळे, प्रा. सुधाकर ढवस, प्रा. किशोर ढोक, प्रा. अमोल काकडे उपस्थित होते