शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणा येथे शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे शासनाच्या शिक्षण विभागाने ठरविलेल्या आदेशात्मक धोरणानुसार शाळाबाह्य मुलांचे सर्वे करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षकांची ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे शासनाच्या शिक्षण विभागाने ठरविलेल्या आदेशात्मक धोरणानुसार शाळाबाह्य मुलांचे सर्वे करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षकांची बैठक घेण्यात आली.

यामध्ये घरोघरी जाऊन शिक्षक सर्व्हे करणार असल्याचे ठरविले.

वाढोणा या गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजारांहून अधिक असून, येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. येथे १ ते ४ वर्ग आहेत. शिवाय समाज सेवा विद्यालय या खासगी शाळेत वर्ग ५ ते १०पर्यंत शिकविल्या जाते. दरम्यान, येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षकांची बैठक पार पडली.

कोविड-१९ या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडल्याने मुलांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण झाला. परिणामी काही पालकांनी मुलांची नावे शाळेत दाखल केली नाहीत. ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेच्या हजेरीपटावर नोंदविली गेली नाही. दोन महिन्यांपासून माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र इयत्ता १ ते ४ वर्गांपर्यंत शाळा अजूनही कोरोना महामारीच्या भीतीमुळे बंदच आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार येथील शिक्षक ६ ते १४ या वयोगटांतील मुलांचा घरोघरी जाऊन सर्व्हे करणार आहेत. याप्रसंगी बैठकीत सरपंच देवेंद्र गेडाम, उपसरपंच भगवान बन्सोड समाजसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप बुलबुले, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदेश्वर बोरकर, सहायक शिक्षक संजय डोर्लीकर, सहायक शिक्षक रूपेश डोर्लीकर, जे. सी. बोरकर, नागदेवते, मुखरू देवेवार उपस्थित होते.