शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण निधीतून साजरा होणार शिक्षक दिन

By admin | Updated: September 1, 2015 00:45 IST

शिक्षक कल्याण निधी गोळा करुन शिक्षक दिन साजरा करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांना दिले आहे.

शासनाचे आदेश : निधीसाठी शिक्षकांची धावपळंनागभीड : शिक्षक कल्याण निधी गोळा करुन शिक्षक दिन साजरा करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांना दिले आहे. सदर आदेश २७ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शिक्षक दिन कसा साजरा करायचा व त्या दिवशी शिक्षक कल्याण निधी कशाप्रकारे गोळा करायचा याबाबत जिल्हा, पंचायत समिती, गाव, नगर व शहर पातळीवर समित्या स्थापन करण्याच्या सूचना या आदेशात करण्यात आल्या आहेत. शिक्षक दिनाबाबत जागृती करण्यासाठी गावोगावी प्रचार सभा घेणे, सर्व विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी वातावरण निर्मिती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.शिक्षक कल्याण निधी गोळा करण्यासाठी कागदी बिल्ल्यांची छपाई करुन ते विक्री करणे व शिक्षक कल्याण निधी जमा करणे, यासाठी प्रत्येक महापालिका व जिल्हास्तरावरुन आवश्यक तेवढे बिल्ले छापून घेण्याच्या सूचना आदेशात आहेत. बिल्ल्यासाठी वापरावयाच्या कागदाचा रंग पांढरा ठरविण्यात आला असून एका बिल्ल्याची किंमत ५ रुपये ठेवण्यात आली आहे.आवश्यकतेप्रमाणे कागदी बिल्ले योग्य त्या यंत्रणेमार्फत छापण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच शिक्षक कल्याण निधी जास्तीत जास्त गोळा करण्याचे काम गावातील कार्यकर्त्यांमार्फत करावे असेही यात म्हटले आहे. कागदी बिल्ल्यांची छपाई केल्यानंतर त्याचा योग्यरितीने हिशेब ठेवण्यासाठी दक्षता घेण्यात यावी व जिल्ह्याच्या वरिष्ठ लेखा परिक्षकाकडून हिशेब तपासून घ्यावा व तपासणी अहवाल शिक्षक संचालक पुणे यांच्या स्तरावर पाठवावा, अशी सूचना यात करण्यात आली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक व करमणूक कार्यक्रम, चित्रपटाचे कार्यक्रम, वर्क्तृत्व स्पर्धा व चर्चासत्र, ग्रामशिक्षण समितीच्या बैठका, खेळाचे सामने आदी कार्यक्रम घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)